Narali Purnima 2022 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Narali Purnima 2022: नारळी पौर्णिमेला का केली जाते समुद्राची पूजा,जाणुन घ्या महत्व

Narali Purnima: नारळी पौर्णिमा हा मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचा महत्त्वचा सण मानला जातो.

दैनिक गोमन्तक

Narali Purnima in Marathi : श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी रहाणारे लोक र्थ समुद्राची पूजा करतात. समुद्राला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्‍तीचेही प्रतीक मानलेले आहे.

प्रामुख्याने मासेमारी करणार्‍या कोळी लोकांचा नारळी पौर्णिमा (Narali Purnima) हा महत्त्वाचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी, जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला नारळ अर्पण करत असतात. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात.

नारळी पौर्णिमेचं महत्त्व

नारळी पौर्णिमा हा मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांसाठी महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी मच्छीमार समाज वरुण देवाची पूजा करतात. समुद्रात नारळ अर्पण करतात. या दिवशी उपवास केला जातो. समुद्रात मासेमारी (Fishing) करताना. काही दुर्घटना घडू नये, म्हणून वरुण राजाला प्रार्थना करतात. या दिवशी केवळ नारळापासून तयार केलेले पदार्थ सेवन केले जातात.

कोळी बांधव नारळ पौर्णिमेला बोटींची पूजा करतात. बोटींना पताका लावतात. छान रंगरंगोटी करून बोटी सजवतात आणि मासेमारीसाठी समुद्रात लोटतात. कोळीवाड्यातून मिरवणुका काढतात.

नारळी पौर्णिमेनिमित्त खास बनवलेल्या नारळाच्या करंजा यांचा नैवद्य बोटीला व समुद्राला दाखवला जातो. समुद्राची यथासांग पूजा करतात. खोल समुद्रात मासेमारीला जाणाऱ्या आपल्या धन्याचे रक्षण व्हावे आणि बोटीवर मुबलक मासोळी मिळावी यासाठी कोळी भगिनी समुद्राला गाऱ्हाणे घालतात. प्रत्येक कोळीवाड्यात नारळी पौर्मिणेच्या काही वेगळ्या परंपराही आहेत. अनेक कोळीवाड्यांमध्ये नारळफोडीचा खेळ होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

Goa Building Rule: गोव्यात अवघ्या 3 मीटर रस्त्यावर बांधकामांना परवानगी? 2023च्या सुधारित नियमांना न्यायालयात आव्हान; सरकारला नोटीस

Goa Language Politics: गोमंतकीय भाषावादाची वृद्धावस्थेकडे वाटचाल? 'राजभाषा करा नाहीतर खुर्ची खाली करा'नंतरही निर्धार समितीचा तिसरा पर्याय कुठे हरवला?

SCROLL FOR NEXT