Morning Routine Tips For Health Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Morning Routine Tips For Health: सकाळी 'हे' रुटीन फॉलो केल्यास दिवसभर राहाल आनंदी अन् निरोगी

सकाळी हे काम केल्यास दिवसभर राहाल आनंदी अन् निरोगी

Puja Bonkile

Happy and Healthy Morning Routine: दिवसाची सुरुवात जर चांगली झाली तर दिवस आनंदी जातो. यामुळे दिवसाची सुरुवात बरोबर करणे फार महत्वाचे आहे. तुम्हाला दिवसभर सकारात्मक वाटते आणि तुमचा दिवस फलदायी देखील बनवते. दिवसाची सुरुवात करण्याचे काही टिप्स फॉलो केल्यास खुप फायदा होइल.

  • सकाळी लवकर उठणे

सकाळी लवकर उठणे आरोग्यदायी (Healthy) असते. सकाळी लवकर उठण्यासाठी अलार्म सेट करावा. यामुळे तुम्ही सर्व कामे योग्य वेळी करू शकता. सकाळच्या घाइ-गर्दीत तुमचे काम कमी बिघडू शकते. यासोबत तुम्हाला आत्मविश्वासही वाटतो.

  • निरोगी नाश्ता

दिवसभर उत्साही राहण्यासाठी हेल्दी ब्रेकफास्ट (Breakfast) करणंही खूप गरजेचं आहे. यामुळे सकाळच्या नाश्त्यात भाज्या, फळे, संपूर्ण धान्य आणि प्रथिने इ. भरपूर साखर असलेले पदार्थ खाणे टाळावे. साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ तुमची उर्जा काढून टाकतात. त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळावे.

  • ध्येय सेट करा

दिवसाच्या सुरुवातीला संपूर्ण दिवसाचे ध्येय निश्चित करावे. तुम्हाला दिवसभर काय करायचे आहे याची तयारी करा. हे तुम्हाला प्रेरित करते. तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करू शकता.

  • हायड्रेट

निरोगी राहण्यासाठी हायड्रेटेड राहणे देखील खूप महत्वाचे आहे. त्यामुळे दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने (Coffee) करण्याऐवजी एक ग्लास पाणी प्यावे. रात्रभर झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुमच्या शरीराला हायड्रेशनची गरज असते. यामुळे तुमची एनर्जी लेव्हल वाढण्यास मदत मिळते. यासोबत तुमची पचनक्रिया देखील वेगाने काम करते.

  • व्यायाम

सकाळी उठल्यावर स्ट्रेचिंग किंवा व्यायाम करावा. तुम्ही कोणतीही व्यायाम करु शकता. तुम्ही योग, कार्डिओ, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि स्ट्रेचिंग यांसारख्या शारीरिक हालचाली करू शकता. यामुळे तुमचे रक्ताभिसरण सुधारते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT