Vastu Tips For Home
Vastu Tips For HomeDainik Gomantak

Vastu Tips For Home: घरात कोणत्या दिशेला काढू नयेत शूज अन् चप्पल, वाचा वास्तुशास्त्रात काय सांगत

वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला चपला किंवा शूज काढावे हे जाणून घेउया.
Published on

Vastu Tips For Home: हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खुप महत्व आहे. घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यासाठी सर्व गोष्टींना वास्तुशास्त्रात स्थान देण्यात आले आहे. वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला चपला किंवा शूज काढू नयेत आणि कोणत्या दिशेला काढावेत यांच्याबाबत सविस्तर सांगण्यात आले आहे.

  • उत्तर-पूर्वेला ठेवू नये शूज आणि चप्पल

अनेकदा लोक घरात शूज आणि चप्पल बिनधास्त कुठेही काढण्याची सवय असते. वास्तुशास्त्रानुसार (Vastu Tips) घरात शूज आणि चप्पल उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवू नयेत.

यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वास करते. उत्तर किंवा पूर्व दिशेला शूज आणि चप्पल काढल्याने माता लक्ष्मीचा कोप पावते. यामुळे घराची आर्थिक स्थिती कमकुवत होते. यामुळे घरात गरिबी येऊ शकते. कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य (Health) बिघडू शकते.

Vastu Tips For Home
Benefits of Copper Pot: घरात तांब्याचे कलश ठेवल्यास दूर होतील आर्थिक चणचण
  • शूज किंवा चप्पल ठेवण्याची योग्य दिशा ?

वास्तुशास्त्रानुसार घरात शूज आणि चप्पल नेहमी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवल्या पाहिजे. बाहेरून आल्यावर शूज आणि चप्पल दक्षिण किंवा पश्चिम दिशेलाच काढावी. घराच्या (Home) मुख्य दारात शूज आणि चप्पल काढू नयेत हेही ध्यानात ठेवणं महत्वाच आहे.

  • शूज आणि चप्पल उलटे ठेवल्यास होतात दुष्परिणाम

वास्तुशास्त्रानुसार घरात शूज आणि चप्पल कधीही उलटे ठेवू नयेत. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा वास कायम राहातो. नकारात्मक उर्जेमुळे कुटुंबातील सुख-शांती भंग पावते. म्हणूनच शूज आणि चप्पल उलटे ठेवू नयेत. यामुळे घरात गरिबी येते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com