Monsoon Special Tea Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Special Tea: रिमझिम पावसाची मजा द्विगुणित करण्यासाठी घरी बनवा 'हा' स्पेशल चहा

अनेक लोकांची सकाळी ही चहा ने सुरू होते. चला तर मग जाणून घेऊया चाय मसाला कसा बनवायचा हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Monsoon Special Tea: अनेक लोकांची सकाळी ही चहा ने सुरू होते. पावसाळा तर चहा पिण्याची मजाच काही वेगळी असते. चहा प्रेमींना ऋतू कोणताही असो चहा प्यायला आवडतो.पण ऋतूनुसार चहा बनवण्यची पद्धत देखील बदलते.

पावसाळ्यात परफेक्ट चहा बनवायचा असेल तर घरीच चहा मसाला तयार करा. तुम्ही ते बऱ्याच काळासाठी साठवून ठेवू शकता आणि टेस्टी चहाचा आनंद घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया परफेक्ट मसाला चहा कसा बनवायचा.

  • चहा मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य

विलायची

2 ते 3 चमचे लवंगा

1/2 चमचे काळी मिरी

2 काड्या दालचिनी

1/4 कप सुंठ

1चमचा जायफळ

  • कसा बनवावा चहा मसाला

चहा मसाला बनवण्यासाठी वर सांगितलेले सर्व पदार्थ किमान एक ते दोन मिनिटे कोरडे भाजून घ्यावे. नंतर एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर बारीक करुन त्याची पावडर करावी. चहा पावडर नेहमी एअर टाईट डब्यामध्येच ठेवावा.

  • परफेक्ट चहा कसा बनवाल

जर तुम्ही दोन लाकांसाठी चहा बनवत असला तर आधी सर्वात पहिलेद दिड कप पाणी उकळायला ठेवावे. नंतर त्यात चहा पत्ती टाकावी. नंतर त्यात तुळशीचे 1/2 पाने टाकावी.१ मिनिट चांगले उकळू द्यावे. नंतर त्यात दूध टाकावे.

चांगली उकळी आल्यावर तयार केलेला मसाला चहामध्ये टाकावा. नंतर आलं किसून टाकावे. चहा चांगला उकळावा. शेवटी उकळल्यावर त्यात साखर टाकावी. अर्धा मिनिट शिजवा आणि नंतर गरमागरमा मसाला चहाचा आस्वाद घेउ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather: 4 दिवसांत पाऊस न पडल्‍यास धरणांची अवस्‍था 2023 सारखी! मान्‍सूनने पाठ फिरवल्‍याने जलसाठ्यात मोठी घट

Goa Water Crisis: धरणे आटली, चिंता दाटली..! पाऊस लांबल्‍यास 'ओपा'ला बसणार मोठा फटका; गोव्यातील जलसंकट गडद

FIFA World Cup 2026: कतारच्या खेळाडूचं 'ते' घातक टॅकल अन् कॅनडाचा स्टार फुटबॉलपटू मैदानावरच कोसळला; धडकी भरवणारा VIDEO व्हायरल

Monsoon Update: 19 जून उजाडला, तरी पावसाचा पत्ता नाही; पुढील काही दिवस उष्ण व दमट हवामान, शेतकरी चिंतेत

Goa Police Recruitment: गुणवत्तेला प्राधान्य! गोवा पोलिस भरतीत मोठा बदल; आता थेट दिल्लीत होणार उपनिरीक्षकांचे प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT