Monsoon Immunity Booster Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Immunity Booster: पावसाळ्यात प्या हळद-लिंबुचे पाणी अन् वाढवा रोगप्रतिकार शक्ती

पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी स्वंयपाक घरातील हा पदार्थ फायदेशीर ठरतो.

Puja Bonkile

Monsoon Immunity Booster: पावसाळ्याचा सुरू झाला असून अनेक आजारही देखील घेऊन येतात. या दिवसांमध्ये फ्लू, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, डायरिया यासारख्या आजारांना बळी पडू शकतो. पावसाळ्यात आरोग्य जपूण सुद्धा आपण आजारी पडतो. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी लिंबु आणि हळदीचे पाणी पिऊ शकता. या दोन्ही पदार्थांमध्ये बायोएक्टिव्ह संयुगे असतात जे शरीराला अनेक फायदे देतात.

  • पचनसंस्था

लिंबू आणि हळदीचे पाणी पचन संस्था सुरळित कार्य करण्यास मदत करते. लिंबामध्ये असलेले पदार्थ पोट साफ ठेवण्यास मदत करतात. तसेच पावसाळ्यात हळद रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

  • प्रतिकारशक्ती वाढवा

लिंबू आणि हळद याचे पाणी पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते जे रोगप्रतिकारक शक्तीला चालना देण्यासाठी महत्वाचे आहे. या पाण्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली होऊ शकते.

  • जळजळ कमी होते

लिंबू आणि हळद या दोन्हीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. यामुळे जळजळ आणि जुनाट आजारांचा धोका कमी होतो. याशिवाय या मिश्रणात अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. हृदयविकाराचा धोका कमी करण्यास हे पाणी मदत करते.

  • बॉडी डिटॉक्सिफाय

लिंबू आणि हळदीचे पाणी शरीरासाठी नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करू शकते. लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड असल्यामुळे यकृताचे कार्य उत्तेजित होते आणि शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत होते. विषारी पदार्थ काढून टाकल्याने मुरुमांच्या खुणांची समस्या दूर होण्यास मदत होते. त्वचेवर चमकदार बनते.

  • हळद आणि लिंबू पेय कधी प्यावे?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की शरीरासाठी तुम्ही लिंबू आणि हळदीचे पाणी रिकाम्या पोटी पिऊ शकता. असे मानले जाते की हे पाणी सकाळी याचे सेवन केल्याने तुमचे शरीर पोषक तत्वे अधिक प्रभावीपणे शोषून घेते.

जेवणाच्या 30 मिनिटांपूर्वी हे आरोग्यदायी पेय पिणे हा दुसरा पर्याय आहे. असे केल्याने पचनक्रिया उत्तेजित होऊ शकते. पोषक द्रव्यांचे शोषण वाढू शकते आणि निरोगी चयापचय क्रियांना समर्थन देऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT