National French Fry Day: दरवर्षी 13 जुलै हा दिवस नॅशनल फ्रेंच फ्राईज डे म्हणून साजरा केला जातो. फ्रेंच फ्राईज जगभरात साइड डिश म्हणून सर्व्ह केले जातात. फ्रेंच फ्राईज हा पदार्थ बटाट्यापासून बनवला जातो.
ही साइड डिश लहानांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांच्या आवडीची आहे. तुम्ही फ्रेंच फिजच्या अनेक प्रकारांचा आनंद घेऊ शकता. यात टोर्नेडो फ्राईज, शूस्ट्रिंग फ्राईज, लोडेड फ्राईज आणि कर्ली फ्राईज यांचाही समावेश आहे. तुम्ही घरीही सहज फ्रेंच फ्राई बनवू शकता. फ्रेंच फ्राईज बनवणे सोपे आहे.
फ्रेंच फ्राइज बनवण्यासाठी लागणारे साहित्य
बटाटा - 2 किलो
मीठ - 2 चमचे
पुदीना पावडर - 1 टीस्पून
लाल तिखट - 1 टीस्पून
चाट मसाला - १ टीस्पून
तेल
फ्रेंच फ्राइज बनवण्याची कृती
सर्वात पहिले बटाटे स्वच्छ धुवून सोलून घ्यावे.
यानंतर बटाटे फ्रेंच फ्रायच्या आकारात कापून घ्यावे.
यानंतर एका मोठ्या भांड्यात हे फ्रेंच फ्राईज स्वच्छ पाण्याने ठेवावे.
ते भांडे फ्रीजमध्ये २ ते ३ तास ठेवावे. असे केल्याने फ्राईज आतून मऊ आणि क्रिमी राहतात.
यानंतर थोडे पाणी उकळवा. उकळत्या पाण्यात थोडे मीठ घालावे.
पाण्याला चांगली उकळी आल्यावर त्यात भिजवलेले फ्रेंच फ्राईज घालावे. ५ मिनिटांनी गॅस बंद करा.
यानंतर, चाळणीने फ्रेंच फ्राईजमधील पाणी काढून टाका.
यानंतर एक पातळ कापड घ्या. त्यावर फ्रेंच फ्राईज टाकावे. त्यांना 5 मिनिटे थंड होऊ द्यावे.
यानंतर त्यांना झिप लॉक बॅगमध्ये पॅक करा. त्यात फ्रेंच फ्राईज टाका. यानंतर हे पॅकेट फ्रीजमध्ये ३ ते ४ तास ठेवा.
कढईत तेल गरम करा. उच्च आचेवर गरम करा.
यानंतर फ्रोझन फ्रेंच फ्राईज गरम तेलात तळून घ्या.
यानंतर हे फ्रेंच फ्राईज कागदावर काढा.
फ्रेंच फ्राईज मसाला कसा बनवाल
एका भांड्यात एक चमचा मीठ घ्यावे. त्यात 1 चमचा पुदिना पावडर घालावी. त्यात 1 टीस्पून चिली फ्लेक्स, 1 टीस्पून चाट मसाला घालावे. या सर्व गोष्टी नीट मिसळा. तयार आहे फ्रेंच फ्राईज मसाला
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.