Healthy Hair  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Hair Pack: मजबुत अन् घनदाट केसांसाठी वापरा 'हे' हेअर पॅक

पावसाळ्यात केसांची योग्य काळजी घेण्यासाठी तुम्ही घरच्या घरी काही हेअर पॅक बनवू शकता.

Puja Bonkile

Hair Pack for Monsoon: पावसाळ्यात आरोग्यासह केसांची काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्याच केस गळणे, कोंडा होणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. म्हणून पावसात घरगुती गोष्टी वापरून केसांची काळजी घ्यावी.

हेअर पॅक 1

  • साहित्य

- दही

- आवळा

- मेथी

- कढीपत्ता

  • कृती

हा पॅक बनवण्यासाठी सर्व साहित्य दह्यात मिक्स करावे. नंतर रात्रभर भिजत ठेवावे. दुसऱ्या दिवशी मिक्सरमध्ये नीट ब्लेंड करून त्याची पेस्ट तयार करा. आता हा पॅक केसांना नीट लावा. ते केसांवर किमान 10 ते 20 मिनिटे राहू द्या आणि नंतर शॅम्पू करून स्वच्छ धुवावे.

  • हेअर पॅक 2

साहित्य

- मेहंदी पावडर

- शिकेकाई

- आंबे हळद

- आवळा

- दही

- ब्राह्मी

- मुलतानी माती

- कॉफी पावडर

  • कृती

हा पॅक बनवण्यासाठी सर्व गोष्टी दह्यामध्ये मिक्स करावे. नंतर त्याची पेस्ट बनवावी. हे पॅख केसांना चांगले लावावे. हा पॅक काही काळ केसांमध्ये कोरडा होण्यासाठी ठेवा आणि नंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुवावे.

  • हेअर पॅक 3

हे पॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

- आंबट दही

- एलोवेरा जेल

- व्हिटॅमिन ई ऑइल

- लिंबाचा रस

  •  कृती

वरील सर्व साहित्य मिक्स करावे आणि पेस्ट बनवावी. ही पेस्ट केसांच्या मुळात लावावी. साधारण 10 ते 15 मिनिटे तसेच राहू द्यावे. नंतर केस स्वच्छ पाण्याने धुवावे.

पावसाळ्यात कोणती काळजी घ्यावी

  • योग्य शॅम्पुचा निवड करावी

पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी केसांसाठी असा शॅम्पू निवडा ज्यामुळे केसांना कोणतीही हानी होणार नाही. केसांच्या प्रकारानुसार शॅम्पू निवडावा. केस निरोगी ही काळजी घेणे गरजेचे आहे.

  • इलेक्ट्रॉनिक वस्तुंचा वापर टाळावा

पावसाळ्यात केस वाळवण्यासाठी कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करु नका. जर तुम्ही केसांसाठी जास्त उष्णतेचे उपकरण वापरत असाल तर त्यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच आपले केस नैसर्गिकरित्या कोरडे करण्याचा प्रयत्न करा.

  • कोरफड जेल

केसांसाठी तुम्ही कोरफड जेलचा वापर करू शकता. कोरफडमध्ये अ, क आणि ई जीवनसत्त्वे असतात. हे 3 जीवनसत्त्वे केस वाढवण्यासाठी आणि त्यांना चमकदार बनवण्याचे काम करतात. कोरफडीमध्ये व्हिटॅमिन बी 12 आणि फॉलिक अॅसिड सारखी जीवनसत्त्वे असतात. हे केस गळणे कमी करते

  • तेलाने मसाज करावी

पावसाळ्यात नियमितपणे केसांच्या मुळात मसाज करावी. यामुळे तुमचे केस निरोगी राहतील. मसाज केसांना पोषण मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: डिचोलीच्या बगलमार्गावर गुराचा बळी

Goa Crime: बंगळूरमधून आले गोवा फिरायला, जंगलात केली प्रेयसीची हत्या; संशयिताविरुद्ध आरोप निश्चित

Goa Politics: खरी कुजबुज; विजय सरदेसाई, विश्वजीतमध्ये दुरावा?

Ranji Trophy 2025: गोव्याचा डाव गडगडला! 'अर्जुन तेंडुलकर' अपयशी; MPच्या सारांशचा प्रभावी मारा

Marina Project: वादग्रस्त ‘मरिना प्रकल्‍प’ नावशीतून मुरगाव बंदरात! पर्यटनाला देणार चालना; BOT तत्त्‍वावर उभारणी सुरू

SCROLL FOR NEXT