Whiteheads: चेहऱ्यावरील व्हाइटहेड्स कमी करण्यासाठी 'असा' करा अंड्याचा वापर

व्हाइटहेड्स कमी करण्यासाठी अंड्याचा वापर करू शकता.
Whiteheads
WhiteheadsDainik Gomantak
Published on
Updated on

Whiteheads: बदलत्या वातावरणामुळे आरोग्यासह त्वचेवर देखील परिणाम होतात. त्वचेच्या समस्या सर्वांनाच जाणवतात. अनेक वेळा त्वचेचे छिद्रे उघडतात यामुळे बॅक्टेरिया आणि मृत पेशींमुळे त्वचेवर ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स दिसून येतात.

या समस्येवर मात करण्यासाठी अंड्याचा वापर करू शकता. अंड्यातील पांढऱ्या भागाने तुम्ही त्वचेच्या अनेक समस्या दूर करू शकता. तसेच, व्हाईटहेड्सची समस्या देखील कमी करू शकता.

व्हाईटहेड्सची का येतात?

  • हार्मोनल बदल

हार्मोनल बदल झाल्याने त्वचेवर व्हाइटहेड्स वाढू शकतात. विकासावर लक्षणीय परिणाम करू शकतात, विशेषत: किशोरवयीन आणि महिलांमध्ये.

हार्मोनल चढउतारांमुळे सीबमचे उत्पादन वाढू शकते, ज्यामुळे त्वचेला व्हाईटहेड्स होण्याची अधिक शक्यता असते. त्याचप्रमाणे, मासिक पाळीच्या दरम्यान हार्मोनल बदलांमुळे व्हाईटहेड्ससह ब्रेकआउट होऊ शकतात. गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती इतर वेळा असतात जेव्हा हार्मोनल असंतुलन त्वचेवर परिणाम करू शकते.

  • डेड स्किन तयार होणे

जेव्हा तुमच्या त्वचेवर डेड स्किन तयार होतात. तेव्हा ते व्हाईटहेड्स होऊ शकतात. त्वचेतील घाण आणि कोरडेपणामुळे त्वचेमध्ये मृत पेशी तयार होऊ लागतात. त्यामुळे त्वचेतील व्हाईटहेड्ससह इतर समस्या सुरू होतात.

Whiteheads
Relationship Tips: तुमचा पार्टनर तुमच्यासोबत खुश नाही हे कसं ओळखाल...
  • अड्यापासून मास्क करा बनवाव

हे मास्क बनवण्यासाठी एक अंड आणि लिंबाचा रस घ्यावा.

ते बनवण्यासाठी एका भांड्यात अंड्याचा पांढरा भाग आणि लिंबाचा रस मिक्स करावा.

यानंतर चांगले फेटून गाळून घ्यावे.

क्लींजरने चेहरा स्वच्छ करावा.

यानंतर, ब्रशच्या मदतीने, व्हाईटहेड्सवर या मास्कचा थर लावा.

सुमारे 15 ते 20 मिनिटांनंतर, जेव्हा ते सुकते तेव्हा मास्क हलक्या हातांनी घासून काढावा.

यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

हा उपाय तुमच्या त्वचेची छिद्रे उघडण्यास मदत करतो आणि त्वचेच्या समस्या दूर करतो. लिंबू त्वचेचा रंग उजळण्याचे काम करते. यामुळे तुमच्या त्वचेला चमक येते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com