Monsoon Fashion Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Fashion Tips: पावसाळ्यात बाहेर फिरायला जातांना पाळा फॅशनचे 'हे' नियम

पावसाळ्यात नेहमी बाहेर जातांना कोणते कपडे घालावे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Monsoon Care: पावसाळा सुरू झाला असून अनेक लोक भटकंतीसाठी बाहेर जातात. पण पावसाळ्यात बाहेर फिरतांना काळजीपुर्वक कपडे घालावे लागतात. पावसाळ्यात स्टॅलिश दिसायचे असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

  • पांढरे कपडे टाळावे

पावसाळ्यात पांढरे कपडे घालणे टाळावे. कारण चुकूनही पांढऱ्या कपड्यांवर चिखल उडाले तर त्याचे डाग निघत नाही आणि ते अजिबात चांगले दिसत नाही.तुम्हाला फोटो देखील काढता येणार नाही.

  • लेदर शूज टाळा

पावसाळ्यात फूटवेअरची जास्त काळजी घ्यावी. चामड्याचे किंवा पाणी शोषून घेणारे शूज घालणे टाळा. तसेच स्ट्राईप असलेले सँडल पाण्यात भिजल्यानंतर अनेकदा तुटतात. त्यामुळे वॉटरप्रूफ सँडल घाला. जेणेकरून तुम्हाला अचानक कुठेही अडचण येणार नाही आणि पायही चांगले राहतील.

  • लाइट रंगांचे कपडे घालू नका

शिफॉन, जॉर्जेट सारखे पातळ आणि लाइट रंगाचे कपडे घालणे टाळावे. कारण हे कपडे थोड्या पावसात भिजले की लगेच खराब होतात आणि त्यांचा रंगही खराब होतो. त्यामुळे तुम्हाला इम्बॅरेस व्हायचं नसेल तर पावसाळ्यात हलके, पातळ फॅब्रिक असलेले कपड्यांपासून दूरच राहावे.

  • पावसाळ्यात कपड्यांवरचे डाग कसे काढावे

1. लिंबु आणि मीठ

पावसाळ्यात कपड्यावरचे बुरशीचे काळे डाग काढायचे असेल तर तुम्हीलिंहाचा वापर करू शकता. यासाठी लिंबाचा रस आणि मीठ एकत्र करावे. ज्या ठिकाणी काळे डाग आहेत तेथे हे मित्रण लावावे. थोडे घासून कोमट पाण्याने स्वच्छ धुवावे.

2. कोमट पाण्याने कपडे धुवावे

पासाळ्यात कोमट पाण्याने कपडे धुणे चांगले असते. कपड्याचा कुंबट वास आणि डाग कमी होण्यास मदत होते. असे केल्याने कपड्यावरचे जीवजंतू देकील कमी होतात.

3. बेकिंग सोडा

बेकिंग साड्याचा वापर केल्याने कपड्यावरचे डाग सहज निघून जातात. यासाठी बुरशी असलेल्या भागात किंवा डाग असलेल्या भागावर लावावे. अर्धा तास तसेच ठेवावे. नंतर ब्रशने घासून कोमट पाण्याने धुवावे.

4. बोरेक्स पावडर

बोरेक्स पावडर हे असं एक केमिकल आहे ज्यामुळे कपड्यांवरील फंगसचे डाग निघून जातात. यासाठी कपडे धुताना तुमच्या डिटर्जेंटसोबत या पावडरचा वापर करा. 

5. व्हिनेगर

व्हिनेगरचा वापर तुम्ही कपड्यावरचे कोणतेही डाग काढण्यासाठी करू शकता. याचा वापर करण्यासाठी साबणामध्ये व्हिनेगर मिक्स करा आणि डाग असलेल्या ठिकाणी लावा, सुमारे अर्धा तास ठेवा. नंतर कोमट पाण्याने धुवा.

6. टूथपेस्ट

टूथपेस्टचा वापर दात स्वच्छ करण्यासाठी केला जातो, परंतु टूथपेस्टचा वापर न निघणारे डाग दूर करण्यासाठी केला जातो. डाग असलेल्या टूथपेस्ट लावावे आणि घासावे. नंतर कोमट पाण्याने धुवावे.

7. थंड पाणी

पांढऱ्या किंवा हलक्या कपड्यावर डाग असल्यास सर्वप्रथम थंड पाण्यात बुडवून डिटर्जंटमध्ये काही वेळ धुवा. थंड पाण्याच्या प्रभावामुळे अगदी कडक डाग हलके होतात. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fatorda Illegal Casinos: फाताेर्ड्यातील कॅसिनोंना सत्ताधाऱ्यांचं 'अभय'! आमदार सरदेसाईंचा घणाघात; कायदा-सुव्यवस्था धोक्यात

IPL 2026 Points Table: आयपीएलचा क्लायमॅक्स सुरु! दिल्लीला पराभवाची धूळ चारत चेन्नई पुन्हा फॉर्ममध्ये, गुणतालिकेत उडवली खळबळ; मुंबई-केकेआरचं पॅकअप?

'ती' 16 बेटे गोव्याचीच! मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकाचा दावा फेटाळला; महसूल सचिवांना दिले तातडीने चौकशीचे आदेश

Giorgia Meloni Photo: डीपफेकच्या विळख्यात इटलीच्या PM! बनावट फोटो व्हायरल करणाऱ्या युजरला मेलोनींनी झापलं; प्रतिष्ठा धुळीला मिळवण्यासाठी एआयचा वापर

Sarvan Comunidade Land Scam: सर्वण कोमुनिदादची 25 हजार मीटर जमीन परस्पर फस्त, मोठा आर्थिक घोटाळा उघड; गावकऱ्यांना अंधारात ठेवून बिल्डरला जमिनीची विक्री

SCROLL FOR NEXT