Turmeric Tea Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Turmeric Tea: पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हळदीचा चहा ठरतो फायदेशीर

पावसाळ्यात अनेक आजार डोक वर काढतात पण पावसाळ्यात आरोग्याची काळजा घेणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Turmeric Tea: पावसाळा सुरू झाला असून अनेक आजार देखील डोकवर काढतात.यामुळे पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात हळदीचा वापर आरोग्यदाय़ी ठरते. कारण हळदीमध्ये अनेक औषधीयुक्त गुणधर्म असतात.

हळदीचा चहा पिल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांवर दूर होतात. या समस्यांबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे. हळदीचा चहा पिल्यास त्याचे आरोग्यास अनेक फायदे मिळतात.

  • हळदीचा चहा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

हळद

दालचिनी

काळी मिरी

पाणी

गरजेनुसार लिंबाचा रस किंवा मध

  • हळदीचा चहा बनवण्याची कृती

हा चहा बनवण्यासाठी सर्वात पहिले एका ग्लास पाण्यात हळद, दालचिनी आणि काळी मिरी मिक्स करावे. नंतर अर्धा ग्लास पाणी मध्यम आचेवर ठेवावे, नंतर ते गाळून मिश्रण थोडे थंड करून प्यावे. यामुळे अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो. तुम्हाला हवे असल्यास, चव वाढवण्यासाठी तुम्ही हळदीच्या चहामध्ये लिंबाचा रस किंवा मध देखील टाकू शकता.

  • हळदीच्या चहाचे फायदे

  1. पावसाळ्यात प्रतिकारशक्ती कमकुवत होते. यामुळे ही क्षमता वाढवण्यासाठी तुम्ही हळदीचा चहा तुमच्या आहारात समावेश करू शकता. हळदीचा चहा प्यायल्याने केवळ रोगप्रतिकारशक्तीच मजबूत होत नाही तर हळदीचा चहा प्यायल्याने माणूस इतर अनेक संसर्गांपासूनही दूर राहतो.

  2. जरी तुम्हाला लठ्ठपणापासून कमी करायचा असेल तर तुम्ही हळदीचा चहा तुमच्या आहारात समावेश करू शकता. हळदीचा चहा केवळ लठ्ठपणापासून मुक्त होण्यास मदत करू शकत नाही, तर तो फिट राहण्यास देखील मदत करतो.

  3. हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात, जे शरीरातील सूज दूर करण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT