Dosa Cooking Tips: 'या' ट्रिक्सचा वापर करून लोखंडी तव्यावर बनवू शकता क्रिस्पी डोसा

अनेक महिलांना लोखंडी तव्यावर डोसा क्रिस्पी बनवणे अवघड काम वाटते पण तुम्ही पुढिल टिप्स वापरून हे काम सोप करू शकता.
Dosa Cooking Tips
Dosa Cooking TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Cooking Tips: सकाळचा नाश्ता असो किंवा डिनर अनेक लोकांना डोसा खायला आवडतो. साउथ इंडियामध्ये हा पदार्थ खुप प्रसिद्ध आहे. तसेच इडली, उत्तपम यासारखे साउथइंडियन पदार्थ महिलांना बनवणे सोपे वाटते. पण डोसा बनवतांना थोडे कठिण जाते. तुम्ही लोखंडी तव्यावर देखील कुरुकुरित डोसा बनवु शकता.या कुकिमग टिप्स कोणत्या आङेत हे जाणून घेऊया.

डोश्याचे पीठ ठराविक तास आंबविले पाहिजे. डोश्याचे पीठ चांगले एकजीव होऊन ते तव्यावर पातळ पसरावे. तेव्हाच चांगला डोसा तयार होतो.

  • डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

अर्धा कप उडिद डाळ

अर्धा कप वाफवलेला भात किंवा साधा तांदूळ

चवीनुसार मीठ

  • डोश्याचे पीठ कसे बनवावे

उडिद डाळ आणि तांदूळ साधारण दोन ते तीन तास एकत्र भिजवून ठेवावे.

मग त्यात योग्य प्रमाणात पाणी घालून त्याची पेस्ट होईपर्यंत मिक्सरमध्ये एकजीव करून घ्यावे.

या मिश्रणात चिमूटभर मीठ घालून एकत्र मिसळून घ्यावे.

मिश्रण एकदम पातळ होणार नाही याची काळजी घ्यावी

हे मिश्रण ६ ते ७ तास आंबविण्यासाठी ठेवून द्यावे.

पीठ आंबून चांगले वर आले की त्याला आंबलेल्याचा विशिष्ट वासही येईल.

डोश्यासाठी पीठ तयार आहे, असे समजावे.

 लोखंडी तव्यावर डोसा बनवतांना काय करावे

  1. लोखंडी तव्यावर डोसा बनवण्यापूर्वी तव्यावर चिकटलेली घाण आणि तेल स्वच्छ करावे.

  2. नंतर गॅसच्या मंद आचेवर तवा गरम करावा.

  3. नंतर तव्यावर एक चमचा तेल टाकावे आणि हलका धूर येईपर्यंत गरम करून गॅस बंद करावा.

  4. ही ट्रिक वापरून लोखंडी तवा नॉन-स्टिक तव्याप्रमाणे काम करण्यास सुरवात करेल.

  5. तवा थंड झाल्यावर परत एकदा डोसा बनवण्यासाठी तव्यावर तेल लावा आणि मंद आचेवर तव्याला हलके गरम करावे.

  6. आता तव्यावरचे तेल टिश्यू पेपर किंवा ओल्या कापडाने पुसून स्वच्छ करावे.

  7.  यानंतर तव्यावर थोडे पाणी शिंपडावे.

  8. तुमचा तवा डोसा बनवण्यासाठी तयार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com