Mirror Vastu Rules Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Mirror Vastu Rules: घरात या दिशेने आरसा ठेवल्यास व्यवसायात होणार नफा

हाच आरसा चुकीच्या दिशेने किंवा चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास त्यावर पडणारी प्रतिमा नकारात्मक ऊर्जा परावर्तीत करते.

दैनिक गोमन्तक

दिवसातून अनेक वेळा आपण आरसा पाहतो. आपल्या आयुष्यात आरश्याच (Mirror) महत्व वाढलय. वास्तुनुसार, जर आरसा योग्य दिशेने किंवा घराच्या योग्य भिंतीवर (Wall) ठेवला असेल तर सकारात्मक ऊर्जा (Positive Energy) प्रवाहित होते. मात्र हाच आरसा चुकीच्या दिशेने किंवा चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास त्यावर पडणारी प्रतिमा नकारात्मक ऊर्जा परावर्तीत करते. यामुळे त्या घरात राहणाऱ्या लोकांना अनेकदा सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. आपल्या घराच्या आनंदाशी आरशाचा काय संबंध आहे? आनंद आणि समृद्धीसाठी तो कोठे आणि कोणत्या दिशेने ठेवले (Mirror Vastu Rules) पाहिजे हे जाणून घेवूया.

  1. आरसा बसवताना नेहमी लक्षात ठेवा की तो तुटलेला किंवा क्रॅक नसावा.

  2. वास्तुनुसार, घराच्या भिंतीवर आरसा खूप कमी किंवा जास्त उंच नसावा.

  3. आरसा ठेवताना, नेहमी प्रयत्न करा की त्यामध्ये पडणारी प्रतिमा सौंदर्य वाढवेल आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल.

  4. चुकूनही आरसा समोरासमोर ठेवू नका कारण यामुळे निर्माण होणारा वास्तु दोष त्या ठिकाणी शांतता आणि ऊर्जा निर्माण करण्याएवजी अस्वस्थता वाढवेल.

  5. खिडकी किंवा दरवाजासमोर आरसा कधीही ठेवू नका, कारण ती आरशातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा खिडकी किंवा दरवाजाच्या बाहेर ढकलेल.

  1. घराच्या अशा कोपऱ्यात जिथे कमी हालचाल असते आणि ती जागा कमी वापरली जाते, तसेच प्रकाशाची योग्य व्यवस्था नसते, तिथे नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो. अशा जागेला उर्जा देण्यासाठी, तिथे आरशांचा चांगला वापर करून केवळ प्रकाश वाढवता येत नाही, तर वास्तू दोषही तेथून काढता येतो.

  2. जर तुमच्या घराबाहेरचा टेलिफोन, एक मोठे झाड, विजेचा खांब इत्यादी वास्तु दोषांचे प्रमुख कारण असेल तर तुम्ही उत्तल आरसा लावून उलट दिशेने हा प्रवाह परावर्तित करू शकता.

  3. जर आरसा आग्नेय दक्षिण दिशेला भिंतीवर ठेवला असेल तर त्यामुळे व्यवसायात नफा होतो.

  4. वास्तुशास्त्रानुसार, सकाळी उठल्याबरोबर आरशात पाहू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT