भारत हा एक देश आहे जिथे वास्तुशास्त्राला (Vastu Tips) अनन्यसाधारण महत्त् आहे. यामध्ये विविध दिशांचे महत्त्व सांगितले गेले आहे. योग्य दिशेने आधारित वास्तूवर विश्वास ठेवणारे अनेक लोक त्यांचे घर किंवा कार्यालय वास्तुशास्त्रामधील नियमानुसार बांधतात. यामुळे त्यांच्या जीवनात प्रगती होत असल्याचा अनुभव देखील सांगतात. एवढेच नाही तर वास्तुशास्त्रात हे देखील सांगितले गेले आहे की, कोणत्या गोष्टींचे पालन केल्याने तुम्ही तुमच्या घरात सकारात्मक उर्जा वाढवून नकारात्मक ऊर्जा नष्ट करू शकता. आपण हेच जाणून घेणार आहोत घरात सकारात्मक उर्जा तयार होण्यासाठी आपण काय करु शकतो. त्यासाठी हे 5 मार्ग आहे.
हिरवा रंग वाढवतो सकारात्मकता: तुम्हाला माहिती असेल की हिरवा रंग हा शांतीचा प्रतीक आहे. आणि त्यामुळेच असे म्हटले जाते की वनस्पती आपल्याला केवळ निसर्गाच्या जवळ नेत नाहीत तर सकारात्मकता देखील वाढवतात. म्हणून जर तुम्हाला घरातही सकारात्मकता निर्माण करायटी असेल तर तुम्ही घरात मनी प्लांट्स, तसेच घरात वाढणारी फुलझाडं लावू शकता.
एक वाडगा भरुन मीठ : अनेकवेळा घरात एक नकारात्मक वातावरण निर्माण झालेले असते. या वातावरणाचा प्रत्येत गोष्टीवर प्रभाव पडत असतो. या नकारात्मक प्रभावामुळे आपले काम देखील खराब होते.
विंड चाइम्स: आजकाल प्रत्येक घरात विंड चाइम्स (हवेने वाजणारे झुंबर) खूप प्रसिद्ध आहेत. कारण हे विंड चाइम्स घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतात. म्हणून जर तुमच्या घरात विंड चाइम्स नसतील, तर ते नक्की लावा. विंड चाइम्स लावल्यानंतर तुमच्या घरात सकारात्मक आणि आनंदायी वातावरण निर्माण होईल.
आपल्या घराचे प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवा: आपल्या घरातील वातावरण सकारात्मक बनवण्यासाठी सर्वात आधी आपले प्रवेश द्वार किंवा घरात प्रवेश करण्यासाठी वापरली जाणारी जागा स्वच्छ ठेवा. चुकूनही प्रवेश द्वाराजवळ कचरापेटी ठेवू नका. तसेच तुमच्या प्रवेश द्वारात नेहमी प्रकाश राहील याची काळजी घ्या यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येऊ शकते.
आरसा योग्य दिशेला ठेवणे : आल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की आपल्या घरातील आरसा किंवा काचेच्या वस्तू देखील घरातील वातावरणाचे संतूलन राखण्यास मदत करत असतात. त्यामुळे चुकूनही या काचांमधून आपल्याला नकारात्मक वाटणाऱ्या गोष्टी दिसणार नाहीत याची काळजी घ्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.