how to reduce stress Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Mental Health: 'या' सवयींमुळे तुमच्या मनावर येतोय ताण; वेळीच सावध व्हा!! नाहीतर होईल पश्चाताप

Stress Causing Habits: आपण दररोज काही अशा चुका करतोय ज्यामुळे आपल्या मनावर ताण येतोय.. कोणत्या?

Akshata Chhatre

Mental Health Tips: दररोजच्या कामात आपण एवढे व्यस्त असतो की मानसिक आरोग्य धोक्यात आहे हे देखील आपल्या लक्षात येत नाही. शरीराला कुठे लागलं, खरचटलं तर आपण पट्कन डॉक्टरकडे जाऊन त्यावर उपाय करतो मग मानसिक आरोग्याचं काय? मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही विशेष करण्याची गरज नाही तुम्ही काहीसा वेळ स्वतःसाठी काढू शकलात तरीही ते पुरेसं आहे. पण तुम्हाला माहितीये का आपण दररोज काही अशा चुका करतोय ज्यामुळे आपल्या मनावर ताण येतोय.. कोणत्या? चला जाणून घेऊया

१) झोपेची तक्रार:

आरोग्य उत्तम राहणार असेल तर झोप महत्वाची असते. माणसाला किमान आठ तासांची झोप गरजेची आहे, पण मोबाईल बघत किंवा काम करत आपण झोपेकडे मात्र दुर्लक्ष करतो. झोप पूर्ण न झाल्याने तुमच्या स्मरणशक्तीवर देखील परिणाम होऊ शकतो, म्हणूनच झोपताना मोबाईल न घेता किमान एक पुस्तक वाचा ज्यामुळे झोप लागेल आणि चिंता दूर होईल.

२) नकारात्मक विचार:

अनेकवेळा आपण स्वतःला दोष देत असतो. मला हे जमणारच नाही, मी हे करूच शकत नाही असं म्हणून स्वतःला दोषी ठरवतो. तसं बघायला गेलं तर आपली एवढी चूक देखील नसते पण तुम्हाला माहितीये का सतत मनात येणारे हे नकारात्मक विचार बरोबर नाही. नकारात्मक विचार केल्याने आपण नकारात्मक बनतो आणि आपोआप मनावरचा ताण वाढत जातो. त्यापेक्षा स्वतःला महत्व द्या, तुमच्यातल्या चांगल्या गुणांना खतपाणी घाला.

३)सोशल मीडियाचा अति वापर:

कुठल्याही गोष्टीचा अति वापर हा कधीही बरोबर नाही. मर्यादेत केलेला वापर हा फायद्याचा असतो आणि अतिशयोक्ती ही घातक असते. सोशल मीडियाचे अनेक फायदे आहे हे खरं पण तिचा अति वापर केल्याने, आपण कुणापेक्षा कमी आनंदी आहोत का? आपल्याजवळ त्या सगळ्या गोष्टी नसल्याने आपण कमी पडतोय का? आपण सोडून बाकी लोकं नेहमी आनंदी का असतात असे प्रश्न पडतात, यामधून स्वतःबद्दल प्रश्न निर्माण होतात आणि ताण येतो.

या सगळ्या गोष्टींपासून जर का आपण ठरवून दूर राहिलो तर मन नक्कीच प्रसन्न राहिलं, ज्याचं मन प्रसन्न तो कामात देखील उत्तम प्रगती करतो आणि सुंदर आयुष्य जगतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT