Meeting Etiquette Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Meeting Etiquette: ऑफिस मिटिंगचे शिष्टाचार पाळल्यास मिळेल करिअरमध्ये यश

ऑफिस मिटिंगमध्ये काही शिष्टाचार पाळल्यास करिअरमध्ये यश मिळू शकते.

Puja Bonkile

Meeting Etiquette: प्रत्येक ऑफिसमध्ये दररोज मिटिंग होतात. मिटिंगन अनेकदा दिवसाच्या सुरूवातीलच होतात. या मिटिंगमुळे कामाचे नियोजन करून ध्येय गाठणे सोपे होते. कंपनी आणि त्या दिवसासाठी काही लक्ष्य निश्चित केले जातात. या मीटिंग दरम्यान फक्त दिवस किंवा कामाचे वेळापत्रक ठरत नाही, तर त्याचा तुमच्या करिअरवरही काही सकारात्मक प्रमाणात परिणाम होतो.

उदाहरणार्थ, ऑफिस मीटिंगमध्ये तुम्ही कसे वागता यावर वरिष्ठांचे लक्ष असते. तुम्हाला कदाचित माहित नसेल, परंतु काहीवेळा तुमच्या मिटिंग शिष्टाचारांचा तुमच्या करिअरला खूप फायदा होतो. 

वेळ पाळावी

जर मीटिंग दहा वाजता असेल, तर मीटिंग रूममध्ये किमान पाच मिनिटे लवकर पोहोचावे. जेव्हा तुम्ही वेळेवर मीटिंगसाठी पोहोचता तेव्हा ते तुमच प्रोफेशनलिज्म दिसते. मिटिंग उशीरा सुरू व्हावी असे वरिष्ठांना कधीच वाटत नाही.

पूर्ण तयारी करा

जेव्हा तुम्ही मीटिंगमध्ये जात असता, तेव्हा तुमच्या वरिष्ठांना तुम्ही कंपनीसाठी काही नवीन आइडिया द्यावे असे नक्कीच वाटते. हे करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मीटिंग सुरू होण्यापूर्वी सर्व तयारी करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही मीटिंगचा अजेंडा समजून घ्यावा आणि त्यानुसार तुमच्या नोट्स किंवा मुद्दे तयार करा. एवढेच नाही तर मीटिंगपूर्वी तुमची असाइनमेंट पूर्ण करा. खरं तर, जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा ते तुमच्यावर मीटिंगमध्ये चांगले इंप्रेशन पडते.

मधेच नका बोलू

मिटिंगमध्ये दोघे एका मुद्द्यांवर चर्चा करत असेल तर मधेच बोलू नका. असे करणे चांगले नाही. सर्वात पहिले मीटिंगमध्ये होणाऱ्या सर्व चर्चा काळजीपूर्वक ऐकाव्या. नंतर तुम्हाला तुमचा मुद्दा मांडायचा असेल तर मांडू शकता.

स्पष्ट बोलावे

मीटिंग दरम्यान तुम्ही स्वतः एखादे प्रेझेंटेशन देत असाल तर थोडेसे मोठ्याने आणि स्पष्टपणे बोलावे. यामुळे तुम्हाला अधिक आत्मविश्वास वाढतो. जेव्हा तुमचा आवाज योग्य असेल आणि तुमचा आवाज अगदी स्पष्ट असेल तर सर्वांना तुमचे मुद्दे समजतील.

फोन सायलेंट मोडवर ठेवावा

मीटिंग दरम्यान बरेच लोक त्यांचे फोन टेबलवर ठेवतात, परंतु चुकून तो वाजला तर लक्ष विचलित होऊ शकते. म्हणून, मीटिंग दरम्यान तुमचा फोन सायलंट मोडवर ठेवावा.

या गोष्टी टाळा

पेन टॅपिंग करणे टाळावे.

चुळबुळ करणे टाळावे.

तुमच्या खुर्चीसोबत खेळणे टाळावे.

सारखे पाय हलवू नका.

गुणगुणणे किंवा क्लिक करणे यासारखे आवाज करणे टाळावे.

कारण मिटिंग दरम्यान असे केल्याने तुमच्या आजुबाजूच्या लोकांचे लक्ष विचलित होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

SCROLL FOR NEXT