Money Plant Dainik Gomantak
लाइफस्टाइल

जर तुमच्याही घरात 'ही' लक्षणे दिसत असतील तर होईल आर्थिक हानी....

धार्मिक शास्त्रानुसार आर्थिक समस्या निर्माण होण्यापुर्वी हे संकेत मिळतात.

Puja Bonkile

हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धनाची देवता मानले जाते. माता लक्ष्मी प्रसन्न असेल तर माणसाला आर्थिक समस्या जाणवणार नाही.पण जर माता लक्ष्मी नाराज झाली असेल तर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते.

धार्मिक शास्त्रानुसार धनप्राप्ती होतांना जसे काही शुभ संकेत मिळतात तसेच धनाची हानी होतांना देखील काही अशुभ संकेत मिळतात. ही संकेत नेमके कोणते आहेत हे जाणून घेऊया.

  • दुध उतु जाणे

दुधापासून बनवलेल्या सर्व गोड पदार्थ माता लक्ष्मीला अर्पण करणे शुभ मानले जाते. जर दूध पुन्हा पुन्हा उतू जात असेल तर हे अशुभ मानले जाते. तसेच हातातून दूधाचा ग्लास खाली पडणे देखील अशुभ मानले जाते. त्यामुळे माता लक्ष्मीच्या नाराज आहे असे समजावे.

  • घरातील मनी प्लांट सुकणे

मनी प्लांट हे रोप धनाशी संबंधित वनस्पती मानली जाते. हे रोप घरात लावल्याने पैसा टिकून राहतो असे मानले जाते. पण जर तुमच्या घरात लावलेला मनी प्लांट सुकायला लागला तर माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज आहे हे समजून घ्यावे. तसेच तुम्हाला भविष्यात आर्थिक नुकसान होऊ शकते.

  • दागिने हरवणे

सोने हा अत्यंत मौल्यवान आणि शुभ धातू आहे. तुमचे दागिने हरवले असतील तर ते माता लक्ष्मी नाराज आहे असे समजावे. यामुळे सोन्याचे दागिने काळजीपुर्वक ठेवावे.

नळातून पाणी गळणे

तुमच्या घरातील नळातून पाणी गळत असेल तर ते अशुभ मानले जाते. कारण यामुळे आयुष्यात आर्थिक संकट येऊ शकते.यामुळे घरातील नळांची वेळीच दुरूस्ती करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT