Side Effects of Makhana:  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Side Effects of Makhana: 'या' 5 लोकांनी चुकूनही खाऊ नये मखाना

मखाना आरोग्यासाठी फायदेशीर असूनही या लोकांनी मखाना खाणं का टाळावं?

दैनिक गोमन्तक

मखानामध्ये अनेक पोषक घटक असतात. यामुळे अनेक लोक वेट लॉससाठी आहारात याचा समावेश करतात. मखानामध्ये अँटी इंफ्लामेटरी आणि बॅक्टेरियाविरोधी, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि प्रथिने असे अनेक गुणधर्म आढळतात. आरोग्यासाठी इतकं फायदेशीर असूनही काही लोकांनी हे खाणे टाळले पाहिजे. जाणून घेऊया मखाना (Makhana) कोणाला फायद्याऐवजी नुकसान करू शकतो.

  • गॅस्ट्रिक समस्या

मखानामध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते पचायला जास्त वेळ लागतो. जर तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या असेल तर याचे सेवन करु नये.

  • किडनी स्टोन

जर तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असेल तर मखानाचे सेवन फार मर्यादित प्रमाणात किंवा अजिबात करू नका. मखानामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. याचे अधिक सेवन केल्याने शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते आणि तुमच्या स्टोनचा आकारही वाढू शकतो.

  • कॉमन फ्लू

जर तुम्हाला कॉमन फ्लू, सर्दी किंवा डायरियाचा त्रास होत असेल तर तुम्ही मखानाचे सेवन करू नये. फ्लूमध्ये मखाना खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते.

  • जुलाबाची समस्या

तुम्हाला आधीच जुलाबाचा त्रास होत असेल तर मखानाचे सेवन करू नका. यामुळे तुमच्या समस्येत भर पडू शकते.

  • एलर्जीची समस्या

मखानाचे जास्त सेवन केल्याने एलर्जीची समस्या होऊ शकते. कारण मखानामध्ये स्टार्च असते. ज्यामुळे तुमच्या शरीरातील स्टार्चचे प्रमाणही वाढू शकते. अशा स्थितीत मखाना खाल्ल्याने काही लोकांना एलर्जीचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच मखनाचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT