Heart Disease: हिवाळ्यात 'अशी' ठेवा जीवनशैली, अन्यथा तुम्हाला होऊ शकतो हृदयविकार

रक्तदाबामध्ये कमालीची वाढ झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही वाढू लागते.
Heart Disease
Heart DiseaseDainik Gomantak
Published on
Updated on

एका ऋतूमधून दुसऱ्या ऋतूमध्ये जाताना आरोग्य संबंधीच्या तक्रारी वाढतात. कारण प्रत्येक ऋतूत जीवनशैली ठरलेली असते. उदा. उन्हाळ्यात वातावरणात प्रचंड उष्मा असतो, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असते. या उलट हिवाळ्यात वातावरणात थंडपणा असतो, धुकं असतं. परिणामी शरीराचे स्नायू थोडेफार आखडलेले असतात, काम केलं तरी फारसा घाम येत नाही. ऋतुबदल होताना वातावरणातील बदलाचा सामना शरीराला करावा लागतो.

हिवाळ्यात जसजसे तापमान कमी होऊ लागते तसे शरीरातील तापमान कायम ठेवण्यासाठी हृदयाला अतिरिक्त मेहनत करावी लागते. हिवाळा सुरु होताच तापमान खाली येते. अशा परिस्थितीत उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी बनण्याचा धोका वाढतो. तसेच, रक्तदाबामध्ये कमालीची वाढ झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही वाढू लागते.

कोणत्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते?

धूम्रपान करणारे, जास्त वजन किंवा स्थूल असणारे, उच्च रक्तदाब असलेले रुग्ण, जास्त मद्यपान करणारे, ज्यांना आधीच हृदयविकाराचा त्रास आहे अशा लोकांना या ऋतूत हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते.

हिवाळ्यात खालील गोष्टी लक्षात ठेवा-

• उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवा. रक्तदाब नियंत्रित करणाऱ्या औषधांचे सेवन करा.

• या ऋतूत अति थंड ठिकाणी जाणे टाळा आणि उबदार कपडे घाला.

• अस्वास्थ्यकर अन्नाचे सेवन आणि जास्त खाणे टाळा. यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते.

• नियमित आणि मर्यादित स्वरूपात व्यायाम करा.

• या ऋतूत जास्त व्यायाम करू नका, अन्यथा हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

Heart Disease
Swasthyam 2022 : तंत्रशुद्ध प्राणायाम आणि त्याचे 7 नियम

खालील गोष्टींचा अवलंब करा

योग्य आहार- योग्य आहार घेणं म्हणजे जे जीभेला आवडतं तेच न खाता शरीराला उपयुक्त असलेलं अन्न खाणे. चीज, बर्गर हे पदार्थ दिसायला छान दिसतात पण त्याचं अतिसेवन घातक आहे. यातील सॅच्युरेटेड फॅट्स मुळे धमनी काठीण्य, कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त होऊन हृदयविकार होण्याची शक्यता बळावते. म्हणून असे पदार्थ टाळावेत. लोणी, चीज, बर्गर यांचं सेवन‌ मर्यादित प्रमाणात करावं.

फळे व भाजीपाला- फळे व पालेभाज्या यांच्या सेवनाने जी पोषणमूल्यं मिळतात ती असतात मिनरल्स- खनिजे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवणे शक्य होते.

साखरेचे प्रमाण कमी- आहारातील साखरेचे प्रमाण कमी ठेवावे. मुळात साखर आहारातून पूर्णतः वर्ज करणं गरजेचं असतं. साखरेऐवजी तुम्ही गुळाचा वापर करू शकता

Heart Disease
Male Fertility: 'ही' हिरवी भाजी पुरुषांचा 'कमकुवतपणा' करते दूर

मीठाचा मर्यादित वापर- वेफर्स किंवा तत्सम पदार्थ ज्यात मीठाचे प्रमाण अधिक असते, असे पदार्थ खाल्ल्याने शरीरात सोडीयमचे प्रमाण जास्त होते. आणि हृदयावर कामाचा म्हणजे रक्त शुद्ध करण्याचा ताण वाढतो. तो होऊ नये यासाठी मीठ कमी खा. ज्या पदार्थांत मीठाचा मुक्त वापर केला जातो असे खारट पदार्थ टाळा.

मानसिक ताण तणाव टाळा- मानसिक ताण हे हृदयविकाराच्या त्रासाला आमंत्रण. हलकं फुलकं वाचन, संगीत, योगा, मेडीटेशन यांमुळे मानसिक ताण कमी करण्यासाठी मदत होते. मद्यपान, धूम्रपान यामुळे फक्त रक्तवाहिन्यांचे कार्य बिघडते ताण तणाव कमी होत नाहीत. म्हणून कितीही ताण असला तरी योगा, मेडीटेशन यांचीच मदत घ्या.

मद्यपान कमी करा- मद्यपानाने हृदयविकाराचा धोका वाढतो. अतिमद्यपान रक्तदाब वाढवते. रक्तदाब वाढणं हीच ह्रदयविकाराचा झटका येण्याची सूचना असते. दिवसातून एकच ग्लास वाईन ही ठीक आहे पण जर तुम्ही दारु घेतच नसाल तर फार उत्तम आहे. कधीच घेऊ नका.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com