heart attack  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tips to Avoid Heart Attack: हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी स्वत:ला द्या 'ही' वचने

गोमन्तक डिजिटल टीम

धावपळीचे आयुष्य आणि बदलेली जीवनशैली यामुळे आजकाल अनेकजण हृदयविकाराच्या झटक्याला (Heart Attack) बळी पडत आहेत. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने अनेक समस्या उद्भवत आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला स्वतःची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी काही गोष्टींची मनाशी खूनगाठ बांधणे आवश्यक आहे. या सवयी जर स्वत:ला लावून घेतल्या तर भविष्यात तुम्ही हृदयविकाराचा झटका येण्यापासून स्वतःचा बचाव करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत या सवयी.

वचन चांगल्या आणि विना व्यत्यय झोपेचे (Good and Unintrupted Sleep)

हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी, आपण स्वत: ला चांगली झोप घेण्याचे वचन दिले पाहिजे. कारण तुमची झोप व्यवस्थित झाली नाही तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. प्रौढ व्यक्तीसाठी कमीत कमी 9 तासांची झोप अतिशय महत्त्वाची आहे. तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

निरोगी जीवनशैलीचे वचन (Active and Healthy Lifestyle)

निरोगी आरोग्यासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणं अतिशय महत्वाचे आहे. निरोगी जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. एकाच जागी जास्त वेळ बसणे टाळावे. तुमचे बैठे काम असेल तर शारिरिक हलचाली करा. जसं की चालण्यासाठी पायऱ्यांचा वापर करा, थोडा फेरफटका मारा.

तंबाखूचे सेवन टाळा (Avoid Tobacco Consumption)

कोणत्याही प्रकारचे धूम्रपान (Smoking leads to Heart Attack) केल्याने हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. दुसरीकडे, तंबाखूचे सेवन केल्याने शरीरात ऑक्सिजनची कमतरता होते आणि रक्तदाब वाढू लागतो. अशा पस्थितीत हृदयविकाराचा धोका कायम असतो. त्यामुळे तुम्ही सिगारेट किंवा तंबाखूचे सेवन करत असाल तर त्याचे सेवन टाळावे. तसेच भविष्यात तंबाखू किंवा सिगारेटचे सेवन करणार नाही, असे स्वतःला वचन दिले पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: चामुंडेश्वरी देवस्थानात 'जायांची महापूजा'उत्साहात

Pernem: 'बाहर आ.. तेरे को ठोक दूंगा'! दिल्लीकर बाप-लेकावर कारवाई करा; पं.सचिव संघटनेची मागणी

Goa ST Reservation: गोव्‍यात ‘एसटीं’च्या राजकीय आरक्षणासाठी 2032 ची प्रतीक्षा? तज्‍ज्ञांनी व्‍यक्‍त केली शक्‍यता

Goa Marathi Film Festival: गोवा मराठी चित्रपट महोत्सवात कोणते खास सिनेमे पहाल? कोणत्या कलाकारांना भेटाल? वाचा माहिती..

Goa Politics: खरी कुजबुज; मर्दनगडाचे संवर्धन करणार कसे?

SCROLL FOR NEXT