गोवा फॉरवर्डच्या पदाधिकाऱ्यांवरील कारवाई न्यायालयाकडून रद्द

फातोर्डा येथील मंजूर झालेली कामे सार्वजनिक बांधकाम खात्याने अडवून ठेवल्याने 31 डिसेंबर 2021 रोजी गोवा फॉरवर्डच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता.
Court
CourtDainik Gomantak

मडगाव: गोवा फॉरवर्डचे पदाधिकारी दिलीप प्रभुदेसाई व मोहनदास लोलयेकर या दोन पदाधिकाऱ्यांनी शांतता राखण्याचा बॉण्ड द्यावा हा सासष्टीचे उपजिल्हाधिकारी प्रसाद वळवईकर यांनी दिलेला आदेश कायद्याच्या चौकटीत बसत नाही असे नमूद करून दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांनी आज रद्द ठरवून या कारवाईस स्थगिती दिली.

(Action against the officials of Goa Forward canceled by the court)

Court
Hotel 'Silly Souls' हॉटेल ‘सिली सोल्स’ प्रकरणाला वेगळे वळण

फातोर्डा येथील मंजूर झालेली कामे सार्वजनिक बांधकाम खात्याने अडवून ठेवल्याने 31 डिसेंबर 2021 रोजी गोवा फॉरवर्डच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. त्यावेळी पोलिसांनी तो अडविल्यामुळे या आंदोलनकांनी रस्त्यावर ठाण मांडले होते. त्यावेळी पोलिसांनी 45 कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद केला होता. हे प्रकरण उपजिल्हाधिकारी वळवईकर यांच्याकडे पाठविले असता त्यांनी सर्व आंदोलकांनी 20 हजार रुपयांचा बॉण्ड द्यावा असा आदेश दिला होता.

प्रभुदेसाई आणि लोलयेकर यांनी या आदेशाला सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. हा आदेश देताना उपजिल्हाधिकाऱ्यांनी प्राथमिक प्रक्रियाही पूर्ण केली नाही असे नमूद करीत न्या. डिसिल्वा यांनी हा आदेश रद्द केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com