Strawberry Sandwich Dainik Gomantak
लाइफस्टाइल

10 मिनिटात तयार करा स्ट्रॉबेरी सँडविच, लहान-मोठे होतील खुश

स्ट्रॉबेरी आणि व्हीप्ड क्रिमपासून तयार केलेले हे सँडविच तुमच्या मुलाच्या टिफिनसाठी उत्तम पर्याय

दैनिक गोमन्तक

तुम्हाला गोड आणि फ्रूटी पदार्थ आवडत असेल तर बाहेर जाऊन खायची गरज नाही. आपण आपल्या घरीच हे पदार्थ साध्या आणि सोप्या पद्धतीने तयार करू शकतो. सध्या कडक उन्हाळा तापत आहे आणि अशा परिस्थितीत फळांचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे आहे. (Strawberry Sandwich Recipe)

तसेच हे सँडविच तुमच्या आरोग्यासाठी उतत्म आहे. स्ट्रॉबेरी आणि व्हीप्ड क्रिमपासून तयार केलेले हे सँडविच तुमच्या मुलाच्या टिफिनसाठी आणि मोठ्यांसाठी एक उत्तम पर्याय बनू शकते. अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, खनिजे आणि दुधात भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. हे स्ट्रॉबेरी सँडविच केवळ स्वादिष्टच नाही तर अत्यंत आरोग्यदायी देखील आहे.

हे सँडविच पिकनिक देखील पॅक केले जाऊ शकते. गोड व्हीप्ड क्रीम आणि ताज्या स्ट्रॉबेरीने भरलेल्या या ब्रेडपासून बनवलेल्या या स्ट्रॉबेरी सँडविचने तुमचा दिवस फ्रेश करा. हे सँडविच बनवायला खूप सोपे आहे, सँडविच बनवायसाठी फक्त 4 पदार्थांची आवश्यकता आहे. म्हणून आजच करून पहा आणि सर्वांना खायला द्या.

  • 1 कप स्ट्रॉबेरी

  • 4 ब्रेड स्लाइस

  • 1 कप व्हीप्ड क्रीम

  • 1 टीस्पून मध

  • 1 मूठभर स्ट्रॉबेरी गार्निशिंगसाठी

स्टेप 1: ही झटपट रेसिपी बनवण्यासाठी स्ट्रॉबेरी धुवून कापा आणि काही गार्निशिंगसाठी ठेवा.

स्टेप 2: सर्व साहित्य एकत्र करा, त्यानंतर एक वाडगा घ्या, त्यात मध घाला आणि स्ट्रॉबेरीचे तुकडे घाला हे पुर्ण एकत्र मिसळा.

स्टेप 3: ब्रेड टोस्ट करून घ्या. ब्रेड स्लाइसला क्रीमी मिश्रणाने थर लावा. काप 10 मिनिटे रेफ्रिजरेट करा आणि थंडगार सँडविच सर्व्ह करा. हे खायला घेतांना ताज्या स्ट्रॉबेरीने सजवा त्यामुळे मुलांनाही ते खायला जास्त आवडेल.

इतकंच नाही तर स्ट्रॉबेरी व्यतिरिक्त टरबूज, लीची, आंबा इत्यादीसांरख्या इतर फळांचही तुम्ही सॅडविच करू शकता. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही या फळांच्या सॅडविचचा आनंद घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Actress Video: "भारतीय पुरुष पाकिस्तानी मुलींसाठी वेडे...", पाक अभिनेत्रीच्या दाव्याने सोशल मीडियावर वाद, व्हिडिओ VIRAL

Viral Post: "आता तरी गंभीर व्हा!" विजयाचा पत्ता नाही अन् पराभवांचे रेकॉर्ड्स; नेटकऱ्यांनी गौतम गंभीरला धरलं धारेवर

Goa Crime: मांद्रेत धक्कादायक प्रकार, 6 जणांच्या टोळक्याकडून वृद्ध पती-पत्नीसह मुलाला मारहाण; प्रॉपर्टीच्या वादातून राडा!

Benaulim Beach: एव्हरी डे इज ए गुड डे! फिशरमन पेलेचा बम्पर कॅच; विद्यार्थ्यांनीही घेतले मासेमारीचे धडे Watch Video

VIDEO: स्पेनमध्ये भीषण अपघात! दोन हाय-स्पीड ट्रेनची समोरासमोर धडक; 21 प्रवाशांचा मृत्यू, 70 हून अधिक जखमी

SCROLL FOR NEXT