Roti Noodles Recipe  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Roti Noodles Recipe: उरलेल्या चपातीपासून बनवा नूडल्स!एकदा नक्की ट्राय का

उरलेल्या किंवा शिळ्या चपातीपासून तुम्ही हेल्दी आणि चविष्ट रोटी नूडल्स बनवू शकता.

दैनिक गोमन्तक

Chapati Noodles Recipe : अनेकदा असे घडते की दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात चपाती जास्त बनवली जाते. यामुळे आपण ती फ्रीजमध्ये ठेवतो. दुसर्‍या दिवशीही ती चपाती कोणी खायला तयार होत नाहीत. अनेकदा लोक एकतर ही चपाती गाईला खाऊ घालतात किंवा बळजबरीने फेकून देतात. जर तुम्हीही चपाती वाया घालवत असाल तर जास्त बनवल्यानंतर ती कशी वापरायची हे समजत नसेल तर काळजी करू नका. शिळी उरलेली चपातीला चवदार बनवू शकता.

आम्ही अशी एक रेसिपी सांगत आहोत, ज्याचे नाव ऐकल्यावर मुलांना नक्कीच खावीशी वाटेल. ही रेसिपी म्हणजे चपाती नूडल्स. उरलेल्या चपातीपासून तुम्ही चवदार आणि आरोग्यदायी नूडल्स बनवू शकता. हे नूडल्स चपातीपासून बनवलेल्या आहेत आणि यात काही भाज्याही टाकणार आहोत. त्यामुळे ही हेल्दी रेसिपी आहे. ()

  • चपाती नूडल्स बनवण्यासाठी लागणाे साहित्य

उरलेली रोटी - 1

तेल - 1 टीस्पून

लसूण - 1/2 लवंगा

कांदा - 1 मध्यम आकाराचा

गाजर - 1

सिमला मिरची - 1 लहान

कोबी - 1 कप

टोमॅटो सॉस - 1 टीस्पून

लाल मिरची सॉस - 1 टीस्पून

सोया सॉस - 1 टीस्पून

मीठ - चवीनुसार

काळी मिरी पावडर - 1/2 टीस्पून

लाल तिखट - 1/2 टीस्पून

लिंबाचा रस - 1 चमचा

कोथिंबीर - गार्निशसाठी

  • चपाती नूडल्स बनवण्याची रेसिपी

सर्वात पहिले उरलेली चपाती घ्या. त्याला चाकूच्या साहाय्याने पातळ आकारात कापून घ्या जेणेकरून ते नूडल्ससारखे दिसेल.

कांदा, लसूण आणि गाजर, सिमला मिरची, कोबी अशा सर्व भाज्या बारीक चिरून घ्या.

नंतर गॅसवर तवा ठेवा आणि त्यात तेल टाका. त्यात लसूण आणि कांदा घालून परता.

आता त्यात गाजर, सिमला मिरची, कोबी टाकून नीट परतून घ्यावे.

मंद आचेवर झाकण ठेवून मिश्रण शिजवा.

नंतर टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस, काळी मिरी पावडर, मीठ, लाल तिखट घालून नीट मिक्स करा. नंतर चपाती नुडल्स घालून मिक्स करा.

लिंबाचा रस आणि चिरलेली कोथिंबीर घाला.

चविष्ट रोटी नूडल्स तयार आहेत. ताटात काढा आणि गरमागरम नुडल्सचा आंनद घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Codar IIT Project: ‘गोवा विकायला काढलाय’! आयआयटी आंदोलनात काँग्रेसची उडी; विरियातो उठवणार संसदेत आवाज

Goa Live Updates: कोंकणी प्रजेचो आवाज हरपला! बाबली नायक यांचे निधन

Adivasi Bhavan: आदिवासी भवनाचे काम 2 महिन्‍यांत सुरू करणार! तवडकरांची हमी; GSIDC कडून प्रक्रिया सुरू

Goa Politics: खरी कुजबुज; व्‍हेंझींना ‘त्‍या’ महिलेचा कळवळा नाही का?

ESG: गोवा मनोरंजन संस्थेचा नवीन गोंधळ! गाजलेल्या ‘जुझे’ फिल्मच्या टीमकडून पुरस्कार परत; वादग्रस्त अहवाल हटवला

SCROLL FOR NEXT