Makar Sankranti 2024 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Makar Sankranti 2024: मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे अन् काय करू नये? वाचा एका क्लिकवर

Puja Bonkile

Makar Sankranti 2024: हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खूप महत्त्व आहे. मकर संक्रांती हा वर्षातील पहिला सण आहे. या दिवशी ग्रहांचा स्वामी, सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तो महिन्याचा शेवट आणि हिवाळ्यातील संक्रांतीसह दीर्घ दिवसांची सुरुवात होते.

मकर संक्रांतीचा दिवस सूर्य देवाला समर्पित आहे. म्हणून या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्याची आणि उपवास करण्याची परंपरा आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी मकर संक्रांती 15 जानेवारी 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्माला खूप महत्त्व आहे. या दिवशी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये.

मकर संक्रांतीच्या दिवशी या गोष्टी ठेवा लक्षात

तामसिक पदार्थ टाळावे

मकर संक्रांतीच्या दिवशी कांदा, लसूण, मांस आणि मद्य यांसारखे तामसिक पदार्थ खाणे टाळावे.

सात्विक पदार्थ

मकर संक्रांतीच्या दिवशी सात्विक अन्नाचे सेवन करावे

कोणचाही अपमान करू नका

मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही कधीही ज्येष्ठांचा आणि गरिबांचा अपमान करू नका.

नकारात्मक बोलू नका

मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही कोणाशाही वाईट किंवा नकारात्मक बोलू नका.

मद्यपान टाळावे

मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही मद्यपान टाळावे. यामुळे तुमच्या कुटुंबातून सुख-समृद्धी दूर जाते.

सुका मेवा

मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही तांदूळ, डाळी, गूळ, द्राक्षे, सुका मेवा आणि दुधापासून गोड भात तयार करावा.

मंदिरात जावे

मकर संक्रांतीच्या दिवशी एखाद्या मंदिरात जाऊन देवाचा आशीर्वाद घ्यावा आणि तिथे वेळ घालवा.

गोड भोपळा

मकर संक्रांतीच्या दिवशी गोड भोपळ्याचे सेवन अवश्य करावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: गोव्याचे आजपासून मिशन सिक्कीम! मागच्या लढतीतील चुका टाळण्याचे आव्हान

BCCI T20 Tournament: गोवा महिला क्रिकेट संघाची दणदणीत कामगिरी! जम्मू-काश्मीरचा आठ विकेट राखून पराभव

Karnataka: मुरुडेश्वर मंदिरात बॉम्बस्फोट करण्याचा कट उधळला, कर्नाटकात सहा दहशतवाद्यांना अटक

CM Pramod Sawant: राष्ट्रीय प्रवासात 'गोवा' महत्त्वाची भूमिका बजावेल! मुख्यमंत्री सावंतांनी व्यक्त केला विश्वास

Sancoale News: क्विनीनगरात तणाव! 'रस्ता' प्रश्नावरून नागरिक आक्रमक'; आमदार वाझ यांची मध्यस्थी

SCROLL FOR NEXT