Makar Sankranti 2024 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Makar Sankranti 2024: यंदा किती तारखेला साजरी होणार मकर संक्रांती? नोट करा मुहुर्त अन् रेसिपी

दरवर्षीप्रमाणे यंदाही मकर संक्राती कधी साजरी केली जाणार आहे याबाबत संभ्रम आहे.

Puja Bonkile

Makar Sankranti 2024: मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील नवीन वर्षातील पहिला सण मानला जातो. हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी पौष महिन्यात सुर्य देव मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जोते. हा दिवस सुर्यदेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. हिंदु धर्मानुसार सुर्यदेव उत्तरायण मकर संक्रांतीच्या दिवशी येते. या दिवस भाविक सकाळी लवकर उठून स्नान करून मनोभावे पुजा करतात. तसेच या दिवशी तिळ-गुळापासून विविध पदार्थ बनवले जातात. पण यंदा मकर संक्रांती कधी साजरी केली जाणार याबाबत संभ्रम आहे. चला तर मग जाणून घेऊया मकर संक्रात कधी आहे.

मकर संक्रात कधी साजरी करणार?

ज्योतिषशास्त्रानुसार 15 जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. सकाळी 7:15 ते संध्याकाळी 5:46 पर्यंत शुभ मुहुर्त आहे. याकाळात पुजा, जप, दान करणे शुभ मानले जाते. यामुळे तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसतील.

तिळाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • गूळ

  • तीळ

  • तूप

  • विलायची पावडर

  • बदाम पावडर

Makar Sankranti 2024

कृती

मकर संक्रांतीसाठी तीळ आणि गुळाचे लाडू बनवू शकता.

हे बनवण्यासाठी सर्वात पहिले एका पॅनमध्ये तीळ हलके भाजून घ्यावे.

नंतर त्यांना थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.

नंतर गॅसवर तवा ठेवा, त्यात तूप घालून गरम करून त्यात गूळ घालून पूर्णपणे वितळू द्या.

नंतर गूळ वितळल्यानंतर त्यात तीळ, विलायची पावडर, बारिक केलेले बदाम आणि काजू घालून चांगले मिक्स करावे.

नतंर गॅस बंद करा.

मिश्रण थोडं थंड झाल्यावर हाताला तुप लावून गोल आकारात छोटे लाडू बनवा.

हे लाडू तुम्ही 15-20 दिवस हवाबंद डब्यात ठेवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT