Maha Shivratri 2025: हिंदू धर्मात महाशिवरात्रीला अनन्यसाधारण महत्व आहे. महाशिवरात्रीचा दिवस भगवान महादेवाच्या भक्तांसाठी महत्वाचा असतो. या दिवशी भगवान महादेव आणि माता पार्वतीची पूजा केल्यास वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी येते असे मानले जाते. या दिवशी रुद्राभिषेक करुन महामृत्यूंजय मंत्राचा जप करुन शिवलिंगावर जल आणि बेलपत्र अर्पण करावे, यामुळे भगवान महादेवाची कृपा कायम राहते, असे मानतात. चला तर मग यंदाची महाशिवरात्री कधी आहे, पूजा करण्यासाठी शुभ मुहुर्त काय आहे आणि कोणत्या मंत्रांचे जप करावे याबाबत जाणून घेऊया...
दरम्यान, दरवर्षी माघ महिन्यात कृष्ण पक्षच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी करतात. यंदा महाशिवरात्र 26 फेब्रुवारी रोजी आहे. पंचागांनुसार 26 फेब्रुवारीला चतुर्दशी तिथीचा शुभारंभ सकाळी 11.08 वाजता होणार असून 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.45 वाजता तिथी संपणार आहे. या दिवशी भगवान महादेवाची पूजा, रुद्राभिषेक, उपवास करणे शुभ मानले जाते.
महाशिवरात्रीच्या दिवशी निशिता काल पूजेला खास महत्व आहे. यंदा या पूजेचा मुहूर्त 27 फेब्रुवारी रोजी मध्य रात्री 12.27 वाजल्यापासून ते मध्यरात्री 1.16 वाजेपर्यंत असणार आहे.
रात्री प्रथम प्रहर पूजेचा मुहूर्त - सायंकाळी 6 वाजून 19 मिनिटांपासून 9 वाजून 26 मिनिटांपर्यंत.
रात्री द्वितीय प्रहर पूजेचा मुहूर्त- 26 फेब्रुवारीला रात्री 9 वाजून 26 मिनिटांपासून ते 27 फेब्रुवारीला मध्यरात्री 12 वाजून 34 मिनिटांपर्यंत.
रात्री तृतीय प्रहर पूजेचा मुहूर्त - 27 फेब्रुवारीला मध्यरात्री 12 वाजून 34 मिनिटांपासून ते पहाटे 3 वाजून 41 मिनिटांपर्यंत.
रात्री चतुर्थ प्रहर पूजेचा मुहूर्त - 27 फेब्रुवारीला पहाटे 3 वाजून 41 मिनिटांपासून ते सकाळी 6 वाजून 48 मिनिटांपर्यंत.
महाशिरात्रीच्या दिवशी म्हणजेच 26 फेब्रुवारी रोजी ब्रम्ह्य मुहूर्तावर अंघोळ करुन स्वच्छ कपडे परिधान करावीत. यादिवशी संकल्प व्रत करावे.
सकाळी आणि संध्याकाळीही भगवान महादेव आणि पार्वती मातेची पूजा करावी.
पूजेच्या वेळी भगवान महादेव आणि पार्वती मातेला वस्त्र अर्पण करणे शुभ मानले जाते.
महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे शुभ मानतात.
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्। सदा बसन्तं हृदयारबिन्दे भवं भवानीसहितं नमामि।।
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
ॐ महादेवाय विद्महे रुद्रमूर्तये धीमहि तन्नः शिवः प्रचोदयात्॥
ॐ पार्वतीपतये नमः
ॐ नमः शिवाय
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.