Loksabha Election Voting Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Lok Sabha Election 2024: भर उन्हात मतदान करायला जाताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Know How To Care Yourself While Voting in Heavy Sunlight: निवडणूक आयोगाने 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. देशभरात सात टप्प्यांत निवडणुका पार पडणार आहेत.

Puja Bonkile

Summer Care Tips While Voting For Lok Sabha Election 2024:

यंदा होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. देशभरात एकूण 543 जागांवर 7 टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत मतदान पार पडणार असून 4 जून रोजी निकाल लागणार आहेत. 

उन्हाळ्यात देशभरात निवडणुका होणार आहेत. एप्रिल-मे च्या कडक उन्हात लोकांना मतदानासाठी बूथवर जावे लागणार आहे. अशावेळी मतदारांनीही आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. मतदानासाठी बूथवर जाताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात उन्हाचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

मतदानासाठी बूथवर जाताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • एप्रिल आणि मे महिन्याच्या कडक उन्हात लोकसभा निवडणुका होणार आहेत. अशावेळी बाहेर जाण्यापूर्वी पाण्याची बाटली सोबत ठेवावी. उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे चक्कर येऊ शकते.

  • मतदानाला जाण्यापूर्वी तुम्ही तुमचा चेहरा आणि केस व्यवस्थित झाकून घ्यावे. यामुळे तुमचा उन्हापासून संरक्षण होईल आणि तुमची ऊर्जाही कमी होणार नाही. यासाठी स्कार्फ किंवा टोपी वापरावी.

  • सूर्यप्रकाशामुळे डोळ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी सनग्लासेस घाला. उन्हाळ्यात डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे.

  • मतदाना दरम्यान बूथवर गर्दी झाल्यास थोडा वेळ लागू शकतो. अशावेळी ज्येष्ठांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी एकत्रितपणे सहभागी व्हावे. खराब हवामानामुळे मतदान न करून तुमचे अमूल्य मत वाया घालवू नका.

  • मदताना दरम्यान, बूथवर गर्दी असेल तर थोडे अंतर ठेऊन उभे राहावे. यामुळे तुम्हाल गर्मीने चक्कर आल्यासारखे वाटणार नाही. तसेच घरातून बाहेर पडतांना पोट जेवण आणि पाणी पिऊन निघावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT