Vastu Tips Wearing Locket Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Locket Tips: लॉकेट गळ्यात घालण्यापूर्वी जाणून घ्या 'या' गोष्टी

Vastu Tips Wearing Locket: गळ्यात लॉकेट घालण्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटे देखिल आहेत

दैनिक गोमन्तक

फॅशनच्या या युगात लोक लॉकेट, अंगठ्या यासह अनेक गोष्टी घालतात. काही देव-देवतांचे लॉकेट घालतात, तर काही क्रॉस, गिटार, प्लसचे लॉकेट घालतात. त्याचबरोबर काही लोक रुद्राक्ष, स्फटिकाचे लॉकेट घालतात. जरी लोक ते फॅशनसाठी घालतात, परंतु वास्तुशास्त्रात (Vastushtra) त्यांचे महत्त्व सांगितले आहे. याचा तुमच्या जीवनावर चांगला आणि वाईट दोन्ही परिणाम होऊ शकतो. यामुळे कोणत्याही प्रकारचे लॉकेट घालण्यापूर्वी त्यांचे नियम जाणून घेणे आवश्यक आहे.

हे आहेत लॉकेट शुभ

वास्तुशास्त्रानुसार चांदी, पितळ आणि तांब्यापासून बनवलेले लॉकेट (Locket) घालणे शुभ मानले जाते. तेही परिधान करण्यासाठी वास्तूमध्ये नियम दिलेले आहेत. प्रत्येक धातूचा एक ग्रह नक्षत्र असतो. त्या ग्रह राशीचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर पडतो. कोणतीही धातू नकळत परिधान करू नका अन्यथा तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

देवाचे लॉकेट घालणे कितपत योग्य आहे?
ज्योतिषशास्त्रानुसार शरीरावर देवी-देवतांचे लॉकेट घालणे चांगले मानले जात नाही. शास्त्रानुसार आपले शरीर स्वच्छ राहत नाही. पण, हात न धुता लॉकेटला स्पर्श करणे म्हणजे देवाचा अपमान आहे. यामुळे जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. नकारात्मक शक्ती घरावर वर्चस्व गाजवू शकतात. म्हणून देवाचे लॉकेट घालू नये.

हे लॉकेट घालता येतात

ज्योतिष शास्त्रानुसार देवाचे प्रतीक म्हणून यंत्र असलेले लॉकेट घालणे शुभ मानले जाते. हे लॉकेट घारल्याने घरात सकारात्मक ऊर्जा संचारते आणि वास्तुदोषही दूर होतात. असे म्हणतात की यंत्राचे लॉकेट धारण केल्याने परमेश्वराची कृपा राहते आणि कुटुंबात सुख-समृद्धी नांदते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Renuka Chowdhury: 'चावणारे तर संसदेत बसलेत...' काँग्रेस खासदार रेणुका चौधरींची पाळीव कुत्र्यासोबत एन्ट्री Watch Video

Samantha Ruth Prabhu: चर्चांना पूर्णविराम! समंथाने बांधली लग्नगाठ, नवऱ्यासोबतचा पहिला Photo Viral

रात्रीस खेळ चाले! पिर्णा रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य; Viral Videoतून 'संपेल ना कधीही हा खेळ सरकारचा' गाणं हिट

VIDEO: यशस्वी जयस्वालची 'तेरे नाम' हेअर स्टाईल, विराट कोहलीने उडवली खिल्ली; पाहा खेळाडूंची ऑन-कॅमेरा मस्ती

Goa Accident: अपघाताचे सत्र थांबेना! मुरगाव येथे भरधाव कारची दुचाकीला धडक, 55 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; कारचालकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT