Home Decoration Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Living Room: लहान लिव्हिंग रूमही दिसेल मोठी, वापरा 'या' 5 स्मार्ट होम डेकोर टिप्स

तुम्हीही तुमच्या लिव्हिंगरूमला अशा पद्धतीने सजवू शकता.

Puja Bonkile

घरातील लिव्हिंग रूम हा प्रत्येक घराचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. खास करून महिला लिव्हिंग रूम कशी चांगली दिसेल याकडे लक्ष देत असतात. त्या नवनवीन सजावटीच्या पद्धती शोधत असतात. तुम्हालाही इतरांकडून घराच्या सजावटीचे कौतुक ऐकायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत.

जर तुमच्या घरातील लिव्हिंग रूम लहान असेल तर तुम्ही या टिप्स वापरू शकता.

  • भिंतींना डार्क रंग द्यावा

तुम्हाला जर लहान लिव्हिंग रूम मोठी दिसावी असे वाटत असेल तर तुम्ही रंगावर लक्ष द्यायला हवे. भिंतींना डार्क रंग दिला तर लिव्हिंग रूम मोठी दिसते.

  • योग्य फर्निचर सिलेक्ट करावे

लिव्हिंग रूमचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही फर्निचरची योग्य निवड करणे गरजेचे असते. फर्निचर नेहमी लहान आणि वजनाने हलके असतील याची काळजी घ्यावी. यामुळे तुमची लिव्हिंग रूम मोठी दिसेल.

  • भितींवर शो रॅक तयार करावे

लिव्हिंग रूम मोठी दिसण्यासाठी तुम्ही भितींवर शो रॅक तयार करू शकता. यामध्ये तुम्ही शो च्या वस्तु किंवा छोटे इन डोअर प्लांट देखील ठेऊ शकता. यामुळे तुमची लिव्हिंग रूम स्टायलिश दिसेल.

  • लिव्हिंग रूमधील लाइट कशा असाव्या

लिव्हिंग रूममधील लाइट कशी असावी याचा देखील विचार करायला हवा. कारण लिव्हिंग रूम मोठी दिसावी असे तुम्हाला वाटत असेल तर कॉर्नर लॅम्पऐवजी वॉल लॅम्प आणि वॉल फिक्सरचा वापर करावा. यामुळे लिव्हिंग रूम स्टायलिश आणि आकर्षित दिसेल.

  • सजावटीमध्ये थोडा वेगळेपणा

लिव्हिंग रूममधील तोचतोचपणा कंटाळवाणा वाटत असेल तर अरेंजमेंट्समध्ये बदल करावा. मग यासाठी तुम्ही रूममधील सामानाची जागा बदलू शकता. वेगळ्या पद्धतीची बैठक स्टाईल करून लिव्हिंग रूम मोठी दाखवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT