General knowledge: विमानात मोबाईल 'Flight Mode' वर का ठेवतात?

तुम्हीही जर विमानातून प्रवास केला असेल तर तुम्हालाही मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवण्याची सूचना मिळाली असेल पण यामागे काय कारण आहे हे जाणून घेऊया.
Flight Mode
Flight ModeDainik Gomantak

Flight Mode In Aeroplane:आजकाल प्रत्येकजण स्मार्टफोन वापरतो. लहानांपासून ते वृद्धांच्या हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. स्मार्टफोनचा वापर वाढत आहे पण अनेक लोकांना त्यातील फिचरबद्दल पुरेशी माहिती नसते. असेच एक फिचर म्हणजे फ्लाइट मोड. नावाप्रमाणे या फिचरचा वापर विमानात प्रवास करताना केला जातो. विमानात प्रवास करताना तुमचा मोबाईल फ्लाइट मोडवर ठेवावा, सिट बेल्ट बांधावे यासारख्या सूचना तुम्ही ऐकल्या असेल. पण एखाद्याने मोबाईल फ्लाइट मोडवर ठेवला नाही तर काय होईल हे जाणून घेऊया.

  • फ्लाइट मोड म्हणजे काय?

सर्वच स्मार्टफोनमध्ये Flight Mode किंवा Airplane Mode असे लिहिलेले असते. या सर्वांचे काम एकच आहे. जेव्हा तुम्ही फ्लाइट मोड चालू करता, तेव्हा तुमचा फोन नेटवर्क क्षेत्राबाहेर जातो. त्यामुळे फोनच्या अनेक सेवा बंद होतात.

यामध्ये GPS, Bluetooth, Wi-Fi यासारख्या सेवांचा वापर करू शकत नाही. यामध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे इंटरनेट आणि कॉलिंग सेवेचा वापर करता येत नाही. या मोडमध्ये फक्त तुम्ही डाउनलोड केलेले चित्रपट किंवा गाणे पाहू शकता.

  • फोन Flight Modeवर नसल्यास काय होईल?

जेव्हा विमान उड्डाण करते तेव्हा पायलट नेहमी नियंत्रण कक्षाच्या संपर्कात असतो. हा संपर्क रेडिओ लहरींद्वारे केला जातो. हे विमानाच्या नेव्हिगेशन आणि कम्युनिकेशन सिस्टममध्ये मदत करते. आपला फोन देखील अनेक टॉवर्सशी सतत सिग्नल कनेक्ट करत असतो.

मोबाईलमधून निघणाऱ्या वेव्ह इतर ठिकाणच्या संपर्क यंत्रणेशी जोडू लागतात. त्यामुळे पायलट अणि नियंत्रण कक्ष यांच्यातील संवादामध्ये अडथळा येऊ शकतो. नियंत्रण कक्षाकडून पाठवण्यात येत असलेली माहिती पायलटला स्पष्टपणे ऐकू येत नाही. यामुळे विमान उड्डाण करतांना अडचण येऊ शकते. तसेच विमान क्रॅश होण्याची शक्यता असते. यामुळेच विमानात प्रवास करतांना फोन नेहमी Flight Mode वर ठेवण्याची सुचना दिली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com