कोजागिरी पौर्णिमा ला का बनवतात दूध?  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

कोजागिरी पौर्णिमाचे जाणून घ्या महत्व

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो, असे मानले जाते.

दैनिक गोमन्तक

हिंदू धर्मात आश्विन महिन्यात पौर्णिमेला शरद पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. या वर्षी शरद पौर्णिमा 19 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. शरद पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima) असे देखील म्हणतात. हिंदू धर्मात शरद पौर्णिमेला अधिक महत्व आहे. ज्योतिषांच्या मते वर्षातून फक्त शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र (Moon) सोळा कलांनी परिपूर्ण असतो. असे मानले जाते की या दिवशी आकाशातून अमृत वर्षाव होतो. या दिवशी चंद्राची पूजा केली जाते. असे म्हणतात की या दिवसापासून हिवाळा सुरू होतो. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो, असे मानले जाते. पौर्णिमेच्या रात्री, चंद्राचा दुधाळ प्रकाश सर्वत्र पसरतो. या दरम्यान पौर्णिमेचा सण साजरा केला जातो.

शरद पौर्णिमेच्या दिवशी रात्री दूध घोटून मोकळ्या आकाशाखाली ठेवले जाते. यामागे वैज्ञानिक कारणे आहेत. असे म्हटले जाते की दुधात लैक्टिक अॅसिड भरपूर प्रमाणात आढळते. चंद्राच्या तेजस्वी प्रकाशात दुधात आधीपासून असलेले बॅक्टेरिया वाढवण्यासाठी हे उपयुक्त आहे. त्याचबरोबर दुधात असलेले सुकामेवा आणि केसर यांची अधिक चव वाढवतात. असे मणले जाते की चांदीच्या भांड्यांमध्ये रोग प्रतिकारशक्ती अधिक असते. त्यामुळे दूध चांदीच्या भांड्यात ठेवावी. या दिवशी चंद्राचा प्रकाश हा सर्वात तेजस्वी असतो. या कारणामुळेच पौर्णिमेच्या रात्री मोकळ्या आकाशात दूध ठेवणे फायदेशीर मानले जाते.

शरद पौर्णिम 19 ऑक्टोबर 2021 रोजी साजरी केली जाणार आहे. शुभ वेळ संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुरू होणार असून समाप्ती 20 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Opinion: गाढ वाचेने करू गाढवाचे गुणगान!

Students Stress: न झेपणारे उच्च शिक्षण मुलांवर लादले जातेय का? बुद्धीने ‘कुशाग्र’ असणारी युवापिढी मनाने कमकुवत झाली आहे का?

Goa–London Flight: गोवा-लंडन विमानसेवा पुन्हा सुरु होणार! गोमंतकीयांसाठी खुशखबर; Air Indiaची मिळणार सेवा

Goa: स्‍वदेशी वस्‍तूंना प्राधान्‍य द्या, देश बळकटीत सहभागी व्‍हा! पर्यटनमंत्री खंवटेंचे आवाहन

Asia Cup 2025: शुभमन गिल, अय्यरचे काय करायचे? निवड समितीसमोर प्रश्न; जयस्वालबाबतही करावा लागणार विचार

SCROLL FOR NEXT