Goan Food: कुरकुरीत असे फोण फोव Dainik Gomantk
लाइफस्टाइल

Goan Food: जाणून घ्या फोण्ण फोवची रेसिपी

पोह्याचा हा आगळा वेगळा प्रकार गोव्यात दिवाळीला घरोघरी बनवला जातो.

Puja Bonkile

दिवाळीची धामधूम आपल्याला सगळीकडे पहायला मिळते आहे. त्यातच घराघरांमधून दिवाळीचा फराळ म्हणजे चकली, चिवडा, लाडू अशा पदार्थांचा सुवास येवू लागला आहे . मात्र गोव्यात या पदार्थांचा नाही तर एका वेगळ्याच पदार्थाचा सुवास दरवळतोय. गोव्यात दिवाळी साजरी करण्याची एक वेगळी प्रथा परंपरा आहे. आता गोव्यात दिवाळीला कोणता पदार्थ बनतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तेव्हा जाणून घेवूया गोव्यातील या पदार्थाविषयी.

गोव्यात दिवाळीला पोह्यांचा आगळा वेगळा फराळ बनवला जातो. पोह्याचे अनेक पआदर्थ बनवले जातात. परंतु आज आपण फोण्ण फोव कसे बनवतात हे जाणून घेणार आहोत. कांदा तिखट मिठाची फोडणी घालून केलेले पोहे म्हणजेच फोण्ण फोव.

साहित्य:

पोहे - 4 वाटी पोहे

कांदा - 2

कढीपत्ताची पाने- 4/5

जिरे - एक छोटा चमच

मोहरी - एक छोटा चमच

चवीनुसार मीठ

कृती:

सर्वात प्रथम पोहे थडा वेळ साठी भिजत ठेवावे. नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवावे. नंतर गरम तेलात जीर आणि मोहरी टाकावे. नंतर कांद्याचे बारीक काप आणि कढीपत्ता त्यात टाकावे. याला 5 ते 10 मिनिटे चांगले सोनेरी रंग आला की यात हळद, हिरवी मिरची, शेंगदाणे टाकावे. हे मिश्रण चांगले मिक्स केल्यानंतर यात भिजवलेले पोहे टाकावे. शेवटी स्वादानुसार मीठ घालावे. खाण्यासाठी तयार आहेत तुमचे गरमा गरम फोण्ण फोव. आवड असल्यास तुम्ही यात सजवटीसाठी कोथिंबीर बारीक चिरून टाकू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

SCROLL FOR NEXT