Space Tourism  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Space Tourism: शास्त्रज्ञच नाही तर तुम्हीही करू शकता स्पेसमध्ये प्रवास, येईल एवढा खर्च

स्पेस टुरिझम म्हणजे अंतराळ प्रवास. याद्वारे आता लोकांना अंतराळ प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.

Puja Bonkile

Space Tourism: अनेक लोक भटंकती करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देतात. पण अनेक लोकांना स्पेसमध्ये जाण्याची इच्छा असते. तुम्हालाही जर स्पेसमध्ये जाण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. स्पेस टुरिझममुळे तुम्हीही अंतराळात प्रवास करण्याचा आनंद घेऊ शकता

  • स्पेस टूरिझम म्हणजे काय?

1961 मध्ये प्रथमच मानवाने अंतराळ जवळून पाहिले होते. ही व्यक्ती सोव्हिएत युनियनचे अंतराळवीर युरी गागारिन होते. तेव्हापासून, सूर्यमाला आणि इतर ग्रह समजून घेण्यासाठी अनेक स्पेस मिशन राबविण्यात आले. वेळेसह विज्ञान आणि तंत्रज्ञानातही प्रगती झाली आहे.

आज अवकाशात केवळ शास्त्रज्ञच नाही तर सामान्य लोक देखील स्पेसमध्ये जाऊ शकतात. कारण स्पेस टूरिझममुळे हे शक्य झाले आहे. स्पेस टूरिझम म्हणजे अंतराळ प्रवास. याद्वारे लोकांना पैसे देऊन स्पेसमध्ये प्रवास करण्याचा अनुभव घेता येईल. अनेक कंपन्यांनी अवकाश प्रवासाची तयारी सुरू केली आहे.

  • एका व्यक्तीला किती खर्च येतो?

आपण अंदाज लावू शकता की स्पेस ट्रॅवलचा खर्च हा जास्त असेल. सध्या काही कंपन्या लोकांना अंतराळात जाण्यात यशस्वी ठरल्या आहेत. यामध्येही कंपन्यांचे स्पेसचे वेगवेगळे अर्थ आहेत. याचा अर्थ हे सर्व अंतराळयान वेगवेगळ्या उंचीवर प्रवास करतात. यातील बहुतांश स्पेस टूरिझम कंपन्यांच्या तिकिटाचे दर अद्याप ठरलेले नाहीत.

अब्जाधीश उद्योगपती सर रिचर्ड ब्रॅन्सन यांचे व्हर्जिन गॅलेक्टिक हे स्पेस टूरिझममधील प्रसिद्ध नाव आहे. यामध्ये एका प्रवाशाचे तिकीट 2 कोटी रुपयांपासून सुरू होते. तसेच अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिनच्या स्पेस ट्रॅव्हल कंपनीची किंमत अद्याप ठरलेली नाही.

काही रिपोर्ट्सनुसार एका तिकिटाची किंमत 2.5 कोटी रुपये असू शकते. स्पेस टूरिझमच्या वाढत्या बाजारपेठेत आता भारतही या बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, भारताची अंतराळ संस्था इस्रो 2030 पर्यंत प्रति प्रवासी 6 कोटी रुपये खर्च करून स्पेस टूरिझम सुरू करण्याची योजना आखत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT