जगातील सहापैकी एका जोडप्याला वंध्यत्वाची समस्या; WHO च्या अहवालात समोर आली धक्कादायक बाब!
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने प्रसिद्ध केलेल्या नव्या अहवालानुसार जगभरात सहापैकी एक जोडपे वंध्यत्व या समस्येला सामोरे जात आहे अशी धक्कादायक माहिती दिली आहे. ही समस्या पुरूष किंवा महिलांमध्ये एक भावनिक समस्या असू शकते. याचा परिणाम दोघांवर गंभीर होऊ शकतो. ही समस्या केवळ वैद्यकिय असून वैयक्तिक देखील आहे.
हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत, पाटण्यातील नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी सेंटरच्या डॉ. निधी सिंह यांनी वंध्यत्वाची कारणे आणि परिणाम सांगितले आहेत. त्या म्हणाल्या की, जगभरात सहा पैकी एका जोडप्याला वंध्यत्व या समस्येचा सामना करावा लागत आहे. या समस्येचे मुख्य कारण वय असू शकते. वंध्यत्वामुळे जोडप्यांना अनेक भावनिक, शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते
पण पुरूषांपेक्षा महिलांना या समस्येचा अधिक त्रास होऊ शकतो. कारण मासिक पाळी अनियमित येणे, शारिरिक संबंध ठेवतांना वेदना होणे, हार्मोन्समध्ये बदल यासारख्या समस्यांमुळे महिलांना वंध्यत्व या समस्येला सामोरे जावे लागू शकते.
इतर कारणे म्हणजे काही लोकांना आनुवांशिकतेमुळे देखील या समस्येला सामोरे जावे लागू शकते. तसचे तुमच्या लाइफस्टाइलचा देखील परिणाम प्रजनन क्षमतेवर होतो. जसे की पोषक आहाराचा अभाव,पर्यावरणीय प्रदुषण, ऑफिस किंवा घरातील कामाचा तणाव, लठ्ठपणा, व्हिटॅमिन्सची कमतरता यांचा परिणाम प्रजनन क्षमतेवर होतो.
प्रजनन क्षमता चांगली ठेवायची असेल तर पुरूष आणि महिलांनी कामाचे ताण जास्त घेऊ नये. निरोगी आरोग्यासाठी नियमितपणे व्यायाम करावा. नेहमी पोषक आणि योग्य वेळेत आहार घ्यावा. हेल्दी आणि फिट लाइफस्टाइल असेल तर प्रजनन क्षमतेवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही.
जोडप्यांमध्ये वंध्यत्व समस्येबद्दल जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. वंध्यत्वाची लक्षणे वेळीच ओळखता आल्यास, त्यावर यशस्वी उपचार होण्याची शक्यता अधिक असते. वंध्यत्वाबाबत समाजात जागरुकता निर्माण होण्यासाठी सरकार आणि स्थानिक प्रशासनाने देखील आपल्या स्तरावर प्रयत्न करणं गरजेचं आहे; असंही WHO ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.