Kitchen hacks Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kitchen Hacks: नॉन-स्टिकची भांडी ही' ट्रीक वापरून अशी करा स्वच्छ

Kitchen Hacks: नॉन-स्टिक भांड्यांची जास्त काळजी घ्यावी लागते कारण ते लवकर खराब होऊ शकतात.

दैनिक गोमन्तक

Kitchen Hacks: नॉन-स्टिक भांडी कमी तेलाने स्वयंपाक करण्याच्या उद्देशाने तयार केली जातात. पण या भांड्यांवर एक थर लावला जातो, ज्यामुळे भांड्यांना काहीही चिकटू देत नाही. याशिवाय या भांड्यांचा तळही सामान्य भांड्यांपेक्षा वेगळा असतो.

त्यामुळे ही भांडी अतिशय काळजीपूर्वक सांभाळावी लागतात. अन्यथा ती खराब होतात. त्यामुळे स्टील स्क्रबरसारख्या कठीण वस्तूने ते घासून स्वच्छ करण्याची चूक कधीही करू नये.

तुमची नॉन-स्टिक भांडी जळल्यावरही नाही. स्क्रबरऐवजी तुम्ही पुढे सांगितलेल्या गोष्टींचा वापर करू शकता.

White Salt

मिठाचे पाणी

जळलेली नॉन-स्टिकची भांडी स्वच्छ करण्यासाठी हा सर्वात स्वस्त आणि उत्तम मार्ग म्हणजे मीठाच्या पाण्याचा वापर करणे. तुम्ही मीठाच्या पाण्याने नॉन स्टिकची भांडी घासु शकता. यासाठी कोमट पाण्यात 4-5 चमचे मीठ मिक्स टाकून पेस्ट तयार करावी.

नंतर 15-20 मिनिटे जळलेल्या भांड्यावर टाकावे. नंतर स्पंजने घासून स्वच्छ पाण्याने धुवावे. जर डाग पूर्णपणे निघाला नाही तर ही असे दोनवेळा करावे.

dishwasher liquid

गरम पाण्यात डिशवॉश मिक्स करावे

नॉन-स्टिकची भांडे आतून जळत असल्यास ते गॅसच्या शेगडीवर ठेवावे. त्यात पाणी आणि डिश वॉश टाकावे. नंतर 5 मिनिटे तसेच राहू द्यावे.

हे भांड्याच्या पृष्ठभागावरुन अन्नाचा जळलेला थर काढून टाकेल. नंतर गॅसवरून भांडे काढून थंड होऊ द्या आणि नंतर स्पंजने घासून स्वच्छ करा.

Baking Soda

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर

जळलेली नॉन-स्टिक भांडी नवीनसारखी चमकण्यासाठी गरम पाण्यात बेकिंग सोडा मिक्स करावा. नंतर थोडावेळ हे मिश्रण उकळावे.

नंतर त्यात थोडे व्हिनेगर टाकून पेस्ट तयार करावी. नंतर जळलेल्या भागावर लावा आणि 5-10 मिनिटे सोडा. नंतर स्पंजने घासून स्वच्छ करा. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

SCROLL FOR NEXT