Kitchen Cleaning: अनेक घरांमध्ये मॉड्युलर किचन बनवले आहेत. यामुळे किचन अधिक स्टायलिश दिसते. जितके दिसायला सुंदर आहे तितकेच लवकर खराब देखील होते. यामुळे या किचन ट्रॉली सारखे स्वच्छ ठेवावी लागते. या ट्रॉली स्वच्छ करण्यासाठी कोणत्या पद्धतींचा वापर करावा हे जाणून घेऊया.
किती दिवसांनी स्वच्छ करावी ट्रॉली
महिन्यातून एकदा किचन ट्रॉली स्वच्छ करावी. यामुळे त्यांची चमक कायम राहते. पावसाळ्यात किचन ट्रॉली दोन किंवा तीन वेळा स्वच्छ करावी.
या पदार्थांचा वापर करावा
किचन ट्रॉलीवर साचलेली धुळ आणि चिकटपणा कमी करण्यासाठी बकिंग सोडा,डिशवॉशिंग लिक्विड आणि लिंबाचा रस वापरू शकता. यासाठी एका भांड्यात १ चमचा मीठ, बकिंग सोडा,डिशवॉशिंग लिक्विड आणि लिंबाचा रस मिक्स करून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट ट्रॉलीवर लावावी नंतर कापडाने स्वच्छ करावी. तुम्ही स्क्रबरऐवजी ब्रशचा वापर करू शकता.
खोबरेल तेल
किचन ट्रॉली स्वच्छ केल्यानंतर त्याची चमक वाढवण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता. यासाठी ट्रॉली पूर्णपणे सुकल्यानंतर कापसाने खोबरेल तेलाचे काही थेंब घाला आणि संपूर्ण ट्रॉलीवर लावावे. त्यामुळे किचन ट्रॉली लवकर गंजणार नाही आणि ट्रॉलीची चमकही वाढेल. खोबरेल तेलाऐवजी तुम्ही मोहरीचे तेल देखील वापरू शकता. तसेच योग्य प्रमाणात तेल लावावे. तेल लावल्यानंतर ट्रॉली ठेवण्यापूर्वी सुमारे 1 तास उघडी ठेवावी.
या गोष्टी देखील ठेवा लक्षात
ट्रॉलीमध्ये कधीही ओली भांडी ठेवू नका.
ओल्या कापडाने पुसल्यानंतर ट्रॉली सुकण्यासाठी उघडी ठेवा.
दमट हवामान असेल तर दररोज कोरड्या कपड्याने स्वच्छ करावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.