Vastu Tips: घराची शोभा वाढवण्यासाठी विविध वस्तु ठेवल्या जातात. यामध्ये पडद्यांचा समावेश होतो. घराच्या खिडक्या आणि दारांवर विविध रंगाचे पडदे लावतात. घरात पडदे लावल्याने प्रकाश, वारा आणि थंडीपासून संरक्षण देतात. वास्तुशास्त्रात घरात कोणत्या रंगाचे पडदे लावावे याबाबत सांगितले आहे.
घरात पडदे लावताना रंगांची खास काळजी घेतली जाते. कारण चुकीच्या रंगांचे पडदे लावल्याने वास्तुदोष होऊ शकतो. म्हणून घरात कोणत्याही रंगाचे पडदे लावू नका. वास्तुशास्त्रानुसार पडद्याचे रंग आणि दिशा ठरवावी. घरातील सुख, समृद्धी आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी पडदे कसे असावे याची काळजी घ्यावी.
लाल रंग
वास्तुनुसार घरातील पडदे तुमच्या अनेक समस्या दूर करू शकता. दक्षिण दिशेला लाल रंगाचे पडदे लावावे. यामुळे तुमच्या घरात सतत वाद होत असेल ते कमी होतील. पण बेडरूममध्ये लाल रंगाचे पडदा लावू नका.
गुलाबी रंग
घरात गुलाबी रंगाचे पडदे लावल्यास कुटूबांतील सदस्यांमध्ये प्रेम वाढते. सर्वजन प्रेमाने एकत्र राहतात. बेडरूममध्ये गुलाबी रंगाचे पडदे लावले जातात.
पांढरा रंग
घरात पैशाची कमतरता असेल आणि तुम्ही आर्थिक परिस्थितीमुळे त्रस्त असाल तर वास्तुनुसार तुम्ही घराच्या पश्चिम दिशेच्या दरवाजा किंवा खिडकीत पांढऱ्या रंगाचे पडदे लावू शकता. यामुळे घरात आर्थिक समस्या येणार नाही. बेडरूमच्या उत्तर-पश्चिम दिशेच्या खिडक्यांना क्रिम रंगाचे पडदे लावू शकता. पांढरे पडदे लावल्याने घरात सुख-शांती टिकून राहते.
हिरवा रंग
हिरवा रंग सुख-समृद्धीचे प्रतिक मानले जाते. आयुष्य नीरस झाले असेल तर वास्तुनुसार पुर्व दिशेच्या दार-खिडक्यांमध्ये हिरव्या रंगाचे पडदे लावावे.
पिवळा रंग
पिवळा रंग वास्तुनुसार शुभ मानला जातो. देवघराजवळा पिवळे पडदे लावणे शुभ मानले जाते. त्यामुळे धार्मिक श्रद्धा वाढते. घरात पिवळे पडदे लावल्याने तणाव कमी होतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.