Janmashtami 2021: कसे लागले मुरारीला मोरपीस आणि बासरीचे वेड  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Janmashtami 2021: कसे लागले मुरारीला मोरपीस आणि बासरीचे वेड

जन्मासठमीनिमित्ताने जाणून घ्या श्री कृष्णाच्या आवडत्या गोष्टी.

दैनिक गोमन्तक

संपूर्ण देशात कृष्ण जन्माष्टमीचा (Janmashtami) सण हा मोठ्या उत्साहाने साजरा (Celebrate) केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार, श्री कृष्णाचा जन्म भाद्रपदातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला झाला होता. यासाठी अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहाने तयारी सुरू झाली आहे. बाळ गोपाळ यांना लोणी (Butter) खूप प्रिय आहे. यामुळेच त्यांना 'माखण चोर' या नावाने संबोधले जाते. तसेच त्यांला मोरपीस , बासरी , गाय सुद्धा प्रिय आहे. भगवान श्री कृष्णाला मुरलीधर , बाल गोपाळ, कान्हा, कृष्णा, विष्णु, वासुदेव, मुरारी या सारख्या अनेक नावाने ओळखल्या जाते. जन्माष्टमीनिमित्त जाणून घेवूया श्री कृष्णाच्या आवडत्या गोष्टी आणि त्यामागील उद्देश.

* बासरी

बासरी हे श्री कृष्णाचे आवडते वाद्य आहे. जेंव्हा तो कृष्णमुरारी मग्न होऊन बासरी वाजवतो तेंव्हा सर्व त्या बासरीच्या सुरात हरवून जातात. बासरी हे आनंदाचे प्रतीक आहे. याचा अर्थ असा की कोणत्याही परिस्थितीत आपण नेहमी आनंदी राहायला हवे. स्वत: आनंदी राहून दुसऱ्यांनासुद्धा आनंदी ठेवावे. ज्याप्रमाणे कृष्णा स्वत: बासरी वाजवून आनंदी राहायचा आणि दुसऱ्यांना आनंद द्यायचा.

* मोरपीस

मोरपीस श्री कृष्णाला खूप प्रिय आहे. कारण यात अनेक प्रकारचे रंग असतात. यातील रंग जीवनातील परिस्थितीचे प्रतिनिधीत्व करते. मोरपीसाचा गडद रंग दुखा:चे प्रतीक, फिकट रंग आनंद आणि शांतीचे प्रतीक आहे. याचा अर्थ असा की आपल्याला सुख आणि दुख: या दोन्ही परिस्थितीतून जावे लागते. आपल्याला नेहमी मोरपीस हे कृष्णाच्या डोक्यावर पाहायला मिळते.

* माखन

बाळ गोपाळला लोणी खूप प्रिय आहे. यामुळेच त्यांना 'माखन चोर' असे म्हंटले जाते. त्यावेळी कंस लोकांवर खूप अन्याय करायचा. तो कर स्वरूपात लोकांकडून दूध, लोणी, तूप यासारखे पदार्थ मोठ्या प्रमाणात गोळा करायचा. या अन्यायाचा विरोध करण्यासाठी श्री कृष्ण त्यांच्या मित्रांसोबत लोण्याचे भांडे फोडून खात असे. लोणी मध्ये एक गोडवा असतो. त्या गुणाप्रमाणे आपण सर्वांशी नम्रतेने वागले पाहिजे.

* गाय

गाईमध्ये अनेक गुण असतात. गाईपासून मिळणाऱ्या दूध, दही, तूप, शेण या सर्व गोष्टीं आरोग्यासाठी लाभदायी आहेत. गायला उदारतेचे प्रतीक मानले जाते. श्री कृष्णाचे गाईवरील प्रेम ही शिकवते की तुम्ही आयुष्यात कितीही यशस्वी झालोत तरी अहंकारी बनू नका. नेहमी उदार राहा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: आठवडा विशेष: चंद्र राशीनुसार 'प्रेमसंबंध, आरोग्य आणि आर्थिक' स्थिती कशी राहील? सर्व 12 राशींचं भविष्य वाचा

Omkar Elephant: ओंकार हत्ती 'शांत'च! उपवनसंरक्षकांकडून 'अग्रेसिव्ह' चर्चांना पूर्णविराम, रेस्क्यूसाठी चार ठिकाणं निवडली

Gold Price: बाजारात महागाईचा तडाखा! सोन्याच्या दराने मोडले सर्व रेकॉर्ड; पहिल्यांदाच 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 30 हजाराच्या पार

'खराब रस्त्यांच्या दुरुस्तीची सुरू, 15 दिवसांत काणे पूर्ण होणार'; आपच्या निवेदनानंतर CM सावंतांची माहिती

CM प्रमोद सावंतांविरोधात बदनामीकारक व्हिडिओ करणाऱ्या गौरव बक्शीला 50,000 दंड; कोर्टासमोर मागितली माफी

SCROLL FOR NEXT