Relationship Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship Tips : तुमचा पार्टनर तुम्हाला धोका तर देत नाहीय ना? वाचा..

प्रेमात पडल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीसोबत भविष्याची स्वप्ने पाहू लागता, परंतु कधी कधी पार्टनर तुम्हाला धोका देत असतो, तो टाईमपास करत असतो.

Ganeshprasad Gogate

Relationship Tips नातेसंबंध जपताना दोन्ही बाजूंनी काळजी घ्यावी लागते. जर ही काळजी घेतली नाही तर तुमचे नातेसंबंध लवकरच संपुष्टात येतात. त्यामुळे तुमचा पार्टनर तुम्हाला धोका देतोय, तुमच्यासोबत टाईमपास करत नाही ना, हे जाणून घ्या.आजकाल प्रेमात फसवणूक करणे सामान्य आहे, परंतु हे लवकर समजत नाही. कारण माणसाची मनोवृत्ती आणि विचार बदलत चालले आहेत.

आपण एखाद्यावर जीवापाड प्रेम करतो. आपली जवळची व्यक्ती मानू लागतो. तुम्ही प्रेमसंबंधात असता तेव्हा तुम्ही डोळे झाकून समोरच्यावर विश्वास ठेवता. ती व्यक्ती तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची व्यक्ती बनते. तुमचे सर्व कार्य आणि विचार त्यांच्याभोवती फिरत असतात.

प्रेमात पडल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीसोबत भविष्याची स्वप्ने पाहू लागता, परंतु कधी कधी पार्टनर तुम्हाला धोका देत असतो, तो टाईमपास करत असतो. सुरुवातीला हा प्रकार लक्षात येत नाही.

पण हे जेव्हा समजते त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही भविष्याची योजना आखत आहात, त्यांच्यासाठी तुम्ही फक्त टाईमपास असू शकता. ते कसे शोधायचे ते जाणून घ्या.

या घटनांवरून जाणून घ्या, नेमकं काय चाललंय..

1. असं काही घडत असेल तर सावध व्हा...

तुमचा जोडदार तुम्हाला फसवत नाही ना, हे लक्षात घ्या. गर्लफ्रेंड किंवा तुमचा बॉयफ्रेंड एकत्र क्वालिटी टाइम घालवण्यास वेळ देत नसेल तर समजून जा. त्याला तुमची कंपनी जास्त आवडत नाही.

कारण व्यक्ती कोणावर तरी खूप प्रेम करते. तेव्हा ती नक्कीच पार्टनरसोबत वेळ घालवते. पण जर वेळ मिळेल तेव्हाच ती तुमच्या सोबत वेळ घालवतेय असं होत असेल तर तो केवळ तुमच्यासोबतचा टाईमपास आहे.

2. भांडण झाल्यावरची परिस्थिती...

प्रेमात पडल्यानंतर जोडीदारासोबत कधी ना कधी भांडण हे होतेच. काहीही कारण नसतानाही भांडण होते. किंवा एखादे छोटे कारणही भांडणासाठी पुरेसे असते. मात्र, भांडण झाले आणि भांडणानंतर जोडीदाराने कधीच पुढाकार घेतला नाही तर समजून जा. तुमची निवड चुकतेय.

जिथे प्रेम आणि आपुलकी असते तिथे किरकोळ भांडणे होतात, पण एकाने पुढे जाऊन दुसऱ्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे गोष्टी सोप्या होतात आणि दुरावाही कमी होतो. जी व्यक्ती तुमच्या अहंकारापेक्षा मोठी आहे, म्हणून त्याला मिळवण्यासाठी सर्व काही बाजूला ठेवले जाते.

जर तुम्हीच प्रत्येक वेळी पॅच अप करण्याचा प्रयत्न करत असाल तर समजून घ्या की ती व्यक्ती रिलेशनशिपबाबत काही प्रयत्न करत नाही.

3. पार्टनर तुमच्यासाठी वेळ देतोय?

प्रेमात पडल्यानंतर एकमेकांना वेळ दिला पाहिजे. जर असं काही होत नसेल तर काहीतरी चुकीचं घडतंय असं समजून जावं. तसेच तुमचा जोडीदार तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत असेल तर तुम्ही समजून जा, की तो टाईमपास करत आहे.

जोडीदाराचे शब्द कितीही मजेदार वाटत असले तरी प्रत्यक्षात त्याची कृती काय आहे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या बोलण्याला महत्त्व देत नसाल तर ते नात्यासाठी चांगले नाही. जर तुमचा पार्टनर तुमच्या बोलण्याकडे वारंवार दुर्लक्ष करत असेल तर त्याला तुमच्यासाठी वेळ नाही हे समजून जा .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budh Gochar 2026: बुधाची राहुच्या नक्षत्रात एन्ट्री, 'या' 3 राशींच्या बँक बॅलेन्सची गाडी सुस्साट; व्यापारात भरभराट अन् नोकरीत प्रमोशनचा योग

Mardol: सफर गोव्याची! ओहोळ-नाल्यांचं संगीत ऐकणारं, फुलांचा सुगंध घेऊन येणारं 'म्हार्दोळ'

Sudan Attack: सुदान पुन्हा हादरलं! जीव वाचवण्यासाठी पळणाऱ्यांवरच काळाचा घाला; गोळीबारात 8 मुलांसह 24 निष्पाप नागरिकांचा मृत्यू

"बाबर आझमकडे सिक्स मारण्याची क्षमताच नाही...", LIVE मॅचमध्ये मोहम्मद कैफनं काढली लायकी Watch Video

Bicholim Accident: विजयनगर–कारापूर येथे भरधाव कारची पादचारी महिलेला धडक

SCROLL FOR NEXT