Mobile Dainik Gomantak
लाइफस्टाइल

iPhone-Samsung सह कंपन्यांनी सांगितला मोबाइल हँग न होण्याचा उपाय

Mobile: ज्यामुळे तुमचा फोन स्लो होण्याची आणि हँग होण्याची शक्यता कमी होते.

दैनिक गोमन्तक

Mobile: मोबाईल आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. प्रत्येक कामात मोबाईलचा वाढता वापर लक्षात घेता मोबाईलचे महत्व लक्षात येते. मात्र हाच मोबाईल सतत बंद पडत असेल किंवा हॅंग होत असेल तर मोठी डोकेदुखी बनू शकतो.

ऑनलाइन पेमेंट, तिकिटे बुक करणे याशिवाय सोशल मिडिया आणि अनेक महत्वाचे इमेल्स आणि कॉल्स यासाठी हा मोबाईल नेहमीच आपल्या कामी येत असतो.

तुमचा मोबाईल सतत हँग होत असेल तर तुम्ही एक छोटीशी युक्ती वापरुन यातून मार्ग काढू शकता. हा मार्ग म्हणजे फोन रीस्टार्ट करणे. फोन जर रिस्टार्ट केला तर तो बराच काळ चांगला चालू शकतो.

तुम्ही तुमचा फोन रीस्टार्ट करता, तुम्ही त्याची सगळी प्रोसेस संपवून पुन्हा सुरू करता. फोन रिस्टार्ट केल्यानंतर तुमच्या फोनची मेमरी आणि प्रोसेसर रीफ्रेश करण्यात मदत करते. ज्यामुळे तुमचा फोन स्लो होण्याची आणि हँग होण्याची शक्यता कमी होते.

किती वेळा फोन रिस्टार्ट करावा?

जेव्हा आपण आपला फोन रीस्टार्ट करतो तेव्हा त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. परंतु, दर आठवड्याला हा फोन किती वेळा करावा हे देखील माहीत असणे गरजेचे आहे. तज्ञांच्या मतानुसार, आपण आपला फोन आठवड्यातून किमान तीन वेळा रीस्टार्ट केला पाहिजे.

मोबाईल कम्युनिकेशन कंपनी T-Mobile च्या मते, iPhone आणि Android फोन आठवड्यातून एकदा रीस्टार्ट केले पाहिजेत. रिस्टार्ट केल्यानंतर फोन चांगले काम करतो आणि मोबाईल स्लो होण्याची आणि हँग होण्याची शक्यता कमी होते.

सॅमसंग कंपनीच्या म्हणण्यानुसार, गॅलेक्सी फोन दररोज रीस्टार्ट केले पाहिजेत. यामुळे फोनची कार्यक्षमता सुधारते. सॅमसंग गॅलेक्सी फोनमध्ये ऑटो रीस्टार्ट सेट करण्याचा पर्याय देखील आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन रीस्टार्ट करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT