Where to Buy Apple I-phone 15 in Goa?: Apple iPhone 15 Series 12 सप्टेंबरला आयफोनने लॉन्च केली असून लवकरच भारतीयांच्या हातात आता iPhone 15, iPhone 15 plus, iPhone 15 pro, iPhone 15 pro Max हे फोन्स दिसणार आहेत. आयफोनने 15 Series मध्ये 4 व्हेरियंट लॉन्च करण्यात आले आहेत.
या आयफोन 15 सिरीजमध्ये महत्वाची एक गोष्ट म्हणजे आता यूजर्संना या सिरीजमधील फोन चार्जिंगसाठी USB Type - C चा सपोर्ट मिळेल.
दरम्यान आज आम्ही तुम्हाला iPhone 15 Series बद्दल माहिती देणारच आहोत त्यासोबत ही सिरीज गोव्यात कोणत्या स्टोअर मध्ये उपलब्ध आहे याची माहिती देणार आहोत.
iPhone 15 Series मध्ये iPhone 15, iPhone 15 plus, iPhone 15 pro, iPhone 15 pro Max हे लॉन्च करण्यात आले आहेत. त्याच्या प्री बुकींगला सुरुवात झाली असून अंदाजे 22 सप्टेंबरपर्यंत हा फोन यूजर्संना मिळू शकतो. तर पाहूया या सगळ्या व्हेरियंट्सची वैशिष्टे...
iPhone 15
आयफोन 15 च्या 128 GB व्हेरियंटची किंमत 799 डॉलर आहे. त्याची भारतात अंदाजे किंंमत 66,230 रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. तर iPhone 15 मध्ये 48 मेगापिक्सल मेन कॅमेरा, 24 मेगा पिक्सेल सेकेंडरी तर 12 मेगापिक्सेल फ्रंटकॅमेरा देण्यात आला आहे.
यात A16 Bionic chip देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला गेमिंगचा अनुभव चांगला येणार आहे. याला USB Type - C चा सपोर्ट मिळणार आहे.
iPhone 15 Pro
iPhone 15 Pro चे डिझाईनमध्ये टायटेनियम मटेरिअलचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये नवीन A17 Pro चिप आहे. 48MP मेन कॅमेरा देण्यात आला आहे. iPhone 15 Pro 4K 60fps पर्यंत ProRes व्हिडिओ घेऊ शकतो.
यामध्ये 6.1 इंच HDR डिस्प्ले मिळेल. हे व्हेरियंट ब्लॅक, ब्लू, व्हाईट, नॅचरल टायटेनियम या चार व्हेरिअंट मध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. आयफोन 15 प्रो $999 किमतींपासून सुरू होतो म्हणजेच भारतीय बाजारात त्याची किंमत 82 हजार रुपये अंदाजे असू शकते.
iPhone 15 Series च्या प्री बुकींगला सुरुवात झाली असून गोव्यात iPhoneच्या दोन अधिकृत स्टोअर मध्ये ही सिरीज तुम्हाला उपलब्ध होवू शकते. पणजीतील स्वामी विवेकानंद रोडजवळ असलेल्या iSpace ऍपल स्टोअर मध्ये उपलब्ध होवू शकतो तर पर्वरीतील मॉल दी गोवा या मधील Imagine Store येथे ऍपलच्या अधिकृत स्टोअरमध्ये मिळू शकतो.
तर भारतात मुंबई किंवा दिल्लीतील अॅपल स्टोअरमध्ये iPhone 15 Series बूक करून खरेदी करु शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.