Washing Machine: वॉशिंग मशीन स्वच्छ करण्यासाठी 'या' पद्धतींचा करावा वापर

Washing Machine: जर तुमची वॉशिंग मशीन अस्वच्छ दिसत असेल तर या सोप्या पद्धतींचा वापर करू शकता.
Washing Machine
Washing Machine Dainik Gomantak

Washing Machine Cleaning Tips: वॉशिंग मशीनने कपडे धुणे खूप सोपे झाले आहे. त्यामुळे महिलांचा बराच वेळ वाचतो आणि कपडे धुण्यासाठी कमी मेहनत घ्यावी लागते.

काही लोक आठवड्यातून एकदा कपडे धुण्यासाठी मशीन वापरतात तर काही लोक दररोज किंवा कधीकधीच वापरतात. 

परंतु सारखा वापर केल्यामुळे पाणी, साबण, मळ आणि इतर घटक मशीनमध्ये जमा होतात. ज्यामुळे ते घाण होते.

ही घाण वेळोवेळी साफ न केल्यास मशीन नीट काम करणे बंद करू शकते. त्यामुळे वॉशिंग मशिन स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. चला जाणून घेऊया मशीन स्वच्छ करण्याचे काय करावे.

Washing Machine
कितीही प्रयत्न करून येत नाही झोप? तज्ञांनी सांगितलेल्या 'या' टिप्स येतील कामी; जाणून घ्या

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा

वॉशिंग मशीनच्या ड्रममध्ये 2 कप व्हिनेगर घालावे. आता सर्वात जास्त तापमानावर मशीन चालवावी. ते पूर्ण झाल्यावर,1/2 कप बेकिंग सोडा घाला आणि पुन्हा मशीन चालवा.

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा घाण, चिकट आणि बॅक्टेरिया नष्ट करतात. व्हिनेगर मशीनमधला दुर्गंध दूर करतो. 

लिंबाचा रस

दोन मोठे लिंबू पिळून घ्यावे. हा रस वॉशिंग मशीनच्या ड्रममध्ये टाकावा. लिंबाचे अम्लीय गुणधर्म जीवाणू मारतात आणि फ्रेश वास देखील येतो.

लिंबाच्या रसामध्ये अम्लीय गुणधर्म असतात. जे घाण काढून टाकण्यास मदत करतात.

टूथब्रश आणि जुनी टूथपेस्ट

मशीनचे सर्वात घाणेरडे भाग जसे की डिटर्जंट ट्रे किंवा गॅस्केट स्वच्छ करण्यासाठी जुन्या टूथब्रशचा वापर करावा. 

गरम पाण्याचा वापर

रिकाम्या मशिनमध्ये साधारण कोमट पाण्यात धुतल्याने जिवाणू आणि इतर जंतु नष्ट होतात.मशीन नवी सारखी चमकायला लागते. 

ड्रायर शीट

जर तुमच्या मशीनला वास येत असेल तर तुम्ही ड्रममध्ये ड्रायर शीट टाकून सायकल चालवू शकता. 

बोरॅक्स पावडर

बोरॅक्स पावडर गरम पाण्यात विरघळवून मशिनमध्ये घालावे. हे गंजणे प्रतिबंधित करते आणि साफ करते. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com