International Yoga Day 2023: दरवर्षीप्रमाणे यंदाही 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा होणार आहे. या दिनानिमित्त जे लोक जास्त वेळ बसून काम करतात. त्यांसाठी काही योग प्रकार सांगणार आहोत ज्यामुळे त्यांना लठ्ठपणाच्या समस्येपासून मुक्ती मिळेल.
जे लोक 8 ते 9 तास ऑफिसमध्ये बसून काम करतात त्या लोकांमध्ये लठ्टपणा अधिक जाणवतो. पोटावरची चरबी कमी करण्यासाठी अनेक उपाय करतात. पण पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही. तुम्हाला जर लठ्ठपणा कमी करायचा असेल तर नियमितपणे काही योग प्रकार करणे गरजेचे आहे.
त्रिकोनासन
त्रिकोणासन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे पोट आणि कंबरेवरील चरबी कमी होण्यास मदत होते. संपूर्ण शरीरात रक्त प्रवाह सुरळितपणे होण्यास मदत मिळते. हे आसन केल्याने मांड्यांवरची चरबीही कमी होते. मानेचे दुखणे, टेन्शन, कंबरदुखी यांमध्ये आराम मिळतो.
त्रिकोनासन कसे करावे
सर्वात पहिले सरळ उभे रहावे. दोन्ही पायांच्या मध्ये साधारपणे साडेतीन ते चार फुट अंतर ठेवणे गरजेचे आहे. उजवे पाऊल 90 अंशामध्ये तर डावे पाऊल 15 अंशामध्ये उजवीकडे फिरवावे. तुमच्या उजव्या पायाची टाच आणि डाव्या पायाचा कमानी भाग एका रेषेत असतील याची काळजी घ्यावी.
सेतुबंधासन
सेतुबंधासन म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीराचा आकार पुलासारखा बनवावा लागेल. यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे रक्त प्रवाह सुधारतो आणि पचनसंस्था सुरळित कार्य करते.
सेतुबंधासन कसे करावे
सर्वात प्रथम पाठीवर झोपा आणि दोन्ही हात शरीराजवळ ठेवा. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून कमरेचा भाग वर उचलण्याचा प्रयत्न करावा. हे करताना दोन्ही हात जमिनीवरच रहावेत
भुजंगासन
वजन कमी करण्यासाठी आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही भुजंगासनाचा सराव करू शकता. या आसनामुळे पोटाचे स्नायू मजबूत होतात. पोटाची चरबी सहज कमी होउ शकते.
भुजंगासन कसे करावे
या आसनामध्ये सर्वात पहिले पोटावर झोपावे. नंतर पाठ वर वाकवावी. त्यानंतर तोंड पुढे करुन हे आसन पूर्ण करावे. तोंड पुढे केल्याने सापाच्या फणा काढण्याच्या कृतीची नक्कल केल्यासारके दिसते.
(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.