International Yoga Day 2023: 'या' तीन प्रकारचे योगा बीपी अन् शुगर ठेवतील नियंत्रणात

या 3 योगासनांच्या मदतीने तुम्ही मधुमेह आणि बीपी नियंत्रणात ठेऊ शकता.
Yoga Day 2023
Yoga Day 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

International Yoga Day 2023: दरवर्षी 21 जून हा दिवस जगभरात 'योग दिन' (Yoga Day) म्हणून साजरा केला जाणार आहे. या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मधुमेह आणि बीपीची समस्या असणाऱ्या लोकांसाठी खास योगा सांगणार आहोत.

या तीन योग आसनाच्या मदतीने तुम्ही मधुमेह आणि बीपी नियंत्रणात ठेऊ शकता. तुमच्या शरीराला लवचिक ठेवण्यासोबतच स्नायूंची ताकद आणि शरीराच्या निरोगी ठेवण्यास मदत करते. योगामुळे तुमच्या जीवनात नवी ऊर्जा मिळते. हळूहळू लोकांना योगाची शक्ती समजत आहे आणि अधिकाधिक लोक योगा करण्यावर भर देत आहेत.

 कपालभाती
कपालभातीDainik Gomantak
  • कपालभाती

हा योग प्रकार केल्याने शुगर नियंत्रणात ठेवता येतो. शुगरअसणाऱ्या लोकांनी नियमितपणे सकाळी कपालभाती केल्यास रक्तातील साखर कमी होते.

  • कसे करावे

पहिले दीर्घ श्वास घ्या आणि नंतर श्वास सोडावा. आपले पोट वापरून, डायाफ्राम आणि फुफ्फुसावर दाबा जेणेकरून हवा त्यातून बाहेर पडेल. हवा बाहेर काढण्यासाठी पोटावर दबाव टाकला की श्वास आपोआप बाहेर येऊ लागतो. ही प्रक्रिया 3 मिनिटे करावी. 

  • ते करण्याचे फायदे

तुमची पचनसंस्था आणि श्वसन प्रणाली सुधारते. 

वजन कमी करण्यासाठी फायेदशीर

स्नायूंना लवचिक करण्यास उपयुक्त

तुमची एकाग्रता वाढवण्यासाठी फायदेशीर

  • हे आसन कोणी करू नये

उच्च रक्तदाब, हार्निया, हृदयविकार, पाठीच्या समस्या असणाऱ्यांनी हे आसन करणे टाळावे.

Yoga Day 2023
Right Place For Wind Chimes: घरात कोणत्या दिशेला विंड चाइम लावणे मानले जाते शुभ?
हलासन
हलासन Dainik Gomantak
  • हलासन कसे करावे 

सर्वात पहिले योग मॅट वर पाठीवर झोपावे. आपले हात शरीराच्या जवळ ठेवावे. श्वास घेत पाय वरच्या बाजूस उचलावे. पाय कंबरेपासून 90 डिग्री कोन तयार करावा.पाय वर उचलताना आपल्या हातांनी कमरेला आधार द्यावा. सरळ पायांना डोक्याच्या वर जमिनीच्या दिशेने आणि असे करत करत पाय डोक्याच्या मागे घ्यावे.

  • हलासन करण्याचे फायदे

पोटाच्या समस्या आणि बद्धकोष्ठता दूर होते

शरीरातील चरबी कमी होते

थायरॉईड, किडनी, प्लीहा आणि स्वादुपिंड निरोगी राहतात

उच्च रक्तदाब नियंत्रित राहते

महिलांना मासिक पाळीत होणाऱ्या वेदना कमी होते

स्मृती सुधारणे

त्वचा चमकदार करण्यास मदत

मांडूका आसन
मांडूका आसनDainik Gomantak
  • मांडूका आसन कसे करावे

आपले गुडघे वाकवून वज्रासन स्थितीत बसावे. नंतर दोन्ही हात समोर ठेवावे. त्यानंतर हाताचा अंगठा आणि उरलेली बोटे वरच्या बाजूला ठेवावे. नंतर आपल्या हाताची कोपर ठेवावे. आपल्या संपूर्ण शरीराला बॉलचा आकार द्यावा. नंतर आपली मान पुढे ठेवून सरळ पहावे. 

  • मांडूका आसनाचे फायदे

पोटाचे आजार दुर होतात 

बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्येवर फायदेशीर

पोटातील गॅस कमी होतात

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर

शरीर आरामशीर राहते

अस्वस्थता कमी होते. 

  • हे आसन कोणी करू नये

गर्भवती महिलांनी हे आसन करू नये. यामुळे पाय दुखू शकतात किंवा ज्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे त्यांनीही हे आसन करणे टाळावे. अल्सर असलेल्या लोकांनीही हे आसन करणे टाळावे. 

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com