Independence Day 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Independence Day 2023: निरोगी आयुष्यासाठी 'या' 5 वाईट सवयींपासून स्वत:लाही करा स्वतंत्र

या स्वातंत्र्यदिनी वाईट सवयींपासून दूर करून निरोगी आरोग्य जगू शकता.

Puja Bonkile

Independence Day 2023: दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तर अनेक लोक या दिनानिमित्त वाईट सवयी सोडण्याचा संल्कप करतात. निरोगी आरोग्यासाठी जगण्यासाठी कोणत्या वाईट सवयींना दूर करणे गरजेचे आहे हे जाणून घेऊया.

  • या वाईट सवयींना करा दूर

अपुरी झोप

तुम्हीही रात्री उशिरापर्यंत जागे राहत असाल तर ही सवय सोडा. कारण दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.

झोपेच्या कमतरतेमुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता कमी होऊ शकते. याशिवाय स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलचा स्राव वाढल्याने आणि फील-गुड हार्मोनचे उत्पादन कमी झाल्यामुळे डिप्रेशनला बळी पडण्याचीही शक्यता असते.

  • जंक फूड खाणे

जंक फूड खाणे म्हणजे पोटा संबंधित आजार निर्माण होणे. तुम्हाला जर पचनसंस्था सुरळित सुरू ठेवायची असेल तर जंक फूड खाणे टाळावे.

  • धूम्रपान

या स्वातंत्र्यदिनानिमित्त मद्यपान आणि धूम्रपान करणे टाळावे. या वाईट सवयींमुळे कॅन्सरसह अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे या स्वातंत्र्यदिनी तुम्ही या वाईट सवयीपासून स्वातंत्र्य मिळवू शकता.

  • कमी पाणी पिणे

जर तुम्हालाही कमी पाणी पिण्याची सवय असेल तर या स्वातंत्र्यदिनी ही सवय सोडून द्यावी. कारण शरीरात पाण्याची कमतरता असल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बीएमसी कार्डिओ व्हॅस्कुलर डिसऑर्डरमध्ये 2018 साली प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार कमी पाणी पिणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण जास्त दिसून आले.

जेव्हा तुम्ही पाणी कमी पिता तेव्हा रक्त घट्ट होऊ लागते. रक्तप्रवाहादरम्यान जास्त दाब असतो. तसेच कमी पाणी पिल्याने त्वचा कोरडी पडते, अशक्तपणा येते, तणाव यासारख्या समस्या उद्भवतात. दिवसातून ५ते ६ लिटिर पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर असते.

  • व्यायाम न करणे

व्यायाम टाळणे तुमच्यासाठी एक मोठी समस्या बनू शकते. नियमित व्यायामाने वजन नियंत्रणात राहते. मधुमेह, हृदयविकार, कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो. मानसिक आणि शरिरिक आरोग्य निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणे फायदेशीर ठरते.

  • कॅफिनचे सेवन

जर तुम्हीही दिवसभर चहा-कॉफी पीत असाल तर ही सवय देखील सोडावी. कारण यामुळे निद्रानाश, छातीत जळजळ, डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय पचनाच्या समस्या आणि उच्च रक्तदाब होऊ शकतो. यामुळे कॅफिनचे सेवन प्रमाणात ठेवावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 WC 2026: आफ्रिकेचा 'विजयी षटकार'! वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवत सेमीफायनलचं तिकीट केलं पक्क; मार्करमची तुफानी खेळी ठरली निर्णायक VIDEO

Shirgao Lairai Jatra: ''6 मार्चपर्यंत क्राउड मॅनेजमेंट प्लॅन सादर करा'', शिरगाव जत्रेबाबत हायकोर्टाचा कडक आदेश; चेंगराचेंगरी टाळण्यासाठी सरकारला अल्टिमेटम

Budh Vakri 2026: 23 दिवसांचा 'राजयोग'! बुधाची वक्री चाल पालटणार 'या' 3 राशींचं आयुष्य; 21 मार्चपर्यंत बरसणार पैशांचा पाऊस

Goa Crime: मायणा-कुडतरीत खळबळ! फूस लावून पळवून अल्पवयीन मुलीचं अपहरण, संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल; पालकांचा गंभीर आरोप

Operation Sindhur 2.0: 'ऑपरेशन सिंदूर 2.0' ने उडणार पाकड्यांचा थरकाप, भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडचा थेट इशारा; शत्रूच्या छाताडावर नाचणार 'भैरव' सैन्य! VIDEO

SCROLL FOR NEXT