Morning Tips: दिवसाची सुरूवात करा अ‍ॅपल ज्युसने, होतील अनेक फायदे

सफरचंदचा ज्युस प्यायल्यास अनेक आजार दूर होतात.
Morning Tips
Morning TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Benefits of Drinking Apple Juice in Morning: निरोगी राहण्यासाठी रोज १ सफरचंद खा असा सल्ला डॉक्टर देतात.

रोज अक सफरचंद खाल्याने अनेक आजार दूर राहतात. पण तुम्हाला माहिती आहे का की सफरचंदचा ज्युस पिणे देखील आरोग्यासाठी लाभदायी आहे.

सफरचंदाचा ज्युस पिल्यास त्वचेपासून पोटापर्यंत शरीराला अनेक फायदे मिळतात. तसेच रोज सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद ज्युस पिण्याचे कोणते फायदे आहेत हे जाणून घेऊया.

  • मेंदुसाठी फायदेशीर

सफरचंदाच्या ज्युसमध्ये अनेक पोषक घटक आढळतात. यामुळे मेंदुचे आरोग्य चांगले राहते.

तसेच मेंदुची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करते. तसेच अल्झायमर सारख्या अनेक आजारांना दूर ठेवते.

  • रोगप्रतिकारशक्ती वाढते

सफरचंदचा ज्युस प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबुत होते. यामुळे तुमचे अनेक आजारांपासून रक्षण होते.

या ज्युसमध्ये पॉलिफेनॉल आणि व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात असते. यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबुत होते.

Morning Tips
Breakfast Recipe: उरलेल्या चपातीपासून बनवा परफेक्ट उपमा, नोट करा रेसिपी
  • डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते

सफरचंदाच्या ज्युसमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

सकाळी रिकाम्या पोटी हा ज्युस प्यायल्यास डोळ्या संबंधित अनेक आजार दूर राहतात. डोळ्यांच्या नसा सुरक्षित ठेवण्यास मदत मिळते.

  • बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते

सकाळी रिकाम्या पोटी सफरचंदाचा ज्युस प्यायल्याने पोटा संबंधित आजार दूर होतात. तसेच पचनसंस्था सुरळित कार्य करते.

सफरचंदाचा ज्युस यकृतामध्ये साचलेली घाण डिटॉक्स करण्यास मदत करते. यामुळे शरीरातील रक्त शुध्द होते आणि तुमच्या चेहऱ्यावर चमक दोखील राहते.

  • वजन नियंत्रणात राहते

सकाळी रिकाम्या पोटी सफरचंदाचा ज्युस प्यायल्याने वजन नियंत्रणात ठेवता येते. सफरचंदाचा ज्युस प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे तुम्ही वजन नियंत्रणात ठेऊ शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com