<div class="paragraphs"><p>If you want normal delivery then do these things</p></div>

If you want normal delivery then do these things

 

Dainik Gomantak 

लाइफस्टाइल

जाणून घ्या Normal Delivery चे फायदे

दैनिक गोमन्तक

आई होणे ही एक सुंदर भावना आहे. पण ते अनुभवण्यासाठी स्त्रीला अनेक समस्यांमधून जावे लागते. गरोदरापासून या समस्या सुरू होतात आणि पसूतीपर्यंत वेदना असतात. यासदरम्यान महिला बाळाच्या सुरक्षेततेची आणि तिच्या प्रसुतीची चिंता असते. या वेदना टाळण्यासाठी आजकाल महिला सीजर करतात. पण सीजरनंतर खूप काळजी घ्यावी लागते. तसेच नॉर्मल डिलिव्हरी (Normal Delivery) ही आई आणि बाळासाठी खूप फायदेशीर असते. चला तर मग जाणून घेवूया नॉर्मल डिलिव्हरीचे फायदे काय आहेत.

* नॉर्मल डिलिव्हरीमध्ये फायदे

नॉर्मल डिलिव्हरीमध्ये (Normal Delivery) महिलेच्या शरीलात लवकर बदल होतात. जेव्हा बाळाची वाढ पूर्ण होते तेव्हाच डिलिव्हरी होते. तसेच जेव्हा बाळ बाहेर येण्यास तयार होते, तेव्हाच आईला वेदना सुरू होतात. नॉर्मल डिलिव्हरीनंतर महिलेला जास्त काळ हॉस्पिटलमध्ये (Hospital) राहावे लागत नाही. महिलेचे (Women) शरिर लवकर नॉर्मलमध्ये येते. तसेच पुन्हा गर्भधारणेमध्ये (Pregnancy) नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यताही वाढते. नॉर्मल डिलीव्हरीचे बाळलाही अनेक फायदे होतात. प्रसूतीदरम्यान स्त्रीच्या शरीरात अनेक हार्मोन्स बाहेर पडतात आणि बर्थ कनालमधून जाते, त्यामुळे बाळाची छाती स्वच्छ राहते आणि श्वासोच्छवासाच्या समस्याचा धोका खूप कमी होतो. याशिवाय योनिमार्फत जन्मलेलल्या बाळांना (Baby) मायक्रोबायोम नावाचे संरक्षणात्मक बॅक्टेरिया मिळतात ज्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती वाढते.

* या गोष्टी कराव्यात

* गर्भधारणेदरम्यान गोड किंवा मसालेदार अन्न खाण्याची इच्छा असते. यावेळी क्रेविंग दूर करण्यासाठी चॉकलेट, चीयनीज, पिझ्झा असे पदार्थांचे सेवन न करता सकस आहाराचे सेवन करावे.

* सर्वच महिला गरोदरपणात जास्त काम करत नाहीत. पण तुम्ही गरोदरपणात जितके सक्रिय असाल तितके चांगले असते.पण तुम्ही जड सामान उचलू नये किंवा खाली वाकून काम करू नये. शिवाय वेळोवेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

* गरोदरपणात वाढलेल्या वजनामुळे महिलांचे स्नायू कडक होतात, त्यामुळे त्या नॉर्मल डिलिव्हरीचा दबाव सहन करू शकत नाहीत. यासाठी महिलानी तेलाने मसाज करावी.

* नेहमी सकारात्मक विचार करावे आणि तणावापासून दूर राहावे. यासाठी चांगली पुस्तके वाचा, संगीत ऐका किंवा तुमच्या आवडीचे कोणतेही काम करावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गासाठी राज ठाकरेंचं भर सभेत मोदींकडं साकडं

OCI चे भवितव्य आता गृहमंत्री अमित शहांच्या हाती, CM सावंत म्हणतात... 'आम्ही कोणाला फसविले नाही'

India Russia Relations: भारत रशिया यांच्यात होणार मोठा करार; पुतिन सरकारच्या सहकार्याने बनवला ‘हा’ प्लॅन

Swati Maliwal Assault Case: 'भाजपने षड्यंत्राचा भाग म्हणून स्वाती मालीवाल यांना...', 'आप' नेत्या आतिशी यांचा घणाघात

Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT