Pregnancy Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Hepatitis: जर गर्भवती महिलेला हिपॅटायटीस झाला तर बाळाचे त्यापासून कसे संरक्षण करायचे? वाचा काय सांगतात तज्ञ

Hepatitis During Pregnancy: जर एखाद्या महिलेला गरोदरपणात हिपॅटायटीस झाला तर तो तिच्यासाठी आणि गर्भातील बाळासाठी धोकादायक ठरु शकतो. हिपॅटायटीस हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे, जो यकृतावर परिणाम करतो.

Manish Jadhav

जर एखाद्या महिलेला गरोदरपणात हिपॅटायटीस झाला तर तो तिच्यासाठी आणि गर्भातील बाळासाठी धोकादायक ठरु शकतो. हिपॅटायटीस हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे, जो यकृतावर परिणाम करतो. तो अनेक प्रकारचा असतो, जसे की हिपॅटायटीस ए, बी, सी, डी आणि ई. यापैकी, हिपॅटायटीस बी आणि सी हे गरोदरपणात सर्वात धोकादायक असतात, कारण ते आईकडून बाळाला संक्रमित होऊ शकतात. यामुळे नवजात बाळाला गंभीर लिवर इंफेक्शनही होऊ शकते. एवढचं नाहीतर भविष्यात यकृताचा कर्करोग किंवा सिरोसिसचा धोका देखील वाढू शकतो.

हेल्थलाइनच्या मते, हिपॅटायटीस हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे, जो अनेक कारणांमुळे होऊ शकतो. यामध्ये संक्रमित रक्त किंवा दूषित सुयांचा वापर समाविष्ट आहे. जसे की जुन्या सुईने इंजेक्शन घेणे किंवा ब्लड ट्रांसफ्यूजनमुळेही होतो. तसेच, हा संसर्ग असुरक्षित संभोगातूनही पसरु शकतो. हिपॅटायटीस ए आणि ई बहुतेकदा दूषित अन्न किंवा पाण्यामुळे होतो, तर हिपॅटायटीस बी आणि सी संक्रमित आईकडून बाळाला संक्रमित होऊ शकतो. टॅटू किंवा पियर्सिंगदरम्यान से स्टरलाइज योग्यरित्या न केल्यास देखील संसर्ग होऊ शकतो.

न जन्मलेल्या बाळाचे हिपॅटायटीसपासून संरक्षण कसे करावे?

दिल्लीतील एम्स येथील बालरोग विभागाचे डॉ. राकेश बागडी यांच्या मते, जर गर्भवती महिलेला हिपॅटायटीस बी असेल तर नवजात बाळाला संसर्गापासून वाचवण्यासाठी जन्मानंतर लगेचच दोन इंजेक्शन दिले जातात, म्हणजे पहिल्या 12 तासांत, एक हिपॅटायटीस बी लस आणि दुसरे एचबीआयजी (Hepatitis B immunoglobulin). या दोन्ही लसी एकत्रितपणे बाळाची प्रतिकारशक्ती मजबूत करतात आणि संसर्गाचा धोका झिरोवर आणतात. त्यानंतर, 6 महिन्यांत बाळाला आणखी दोन डोस दिले जातात.

जर एखाद्या महिलेला (Women) हिपॅटायटीस सी असेल तर त्यासाठी सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही, परंतु बाळाच्या जन्मानंतर बाळाची वेळोवेळी तपासणी आणि देखरेख करणे आवश्यक ठरते. या काळात, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रसूतीची पद्धत आणि वेळ ठरवली जाते जेणेकरुन बाळाला संसर्गाचा धोका टाळता येतो.

या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या

गरोदरपणाच्या सुरुवातीलाच हिपॅटायटीसची चाचणी करुन घ्या.

दूषित अन्न आणि पाणी टाळा तसेच स्वच्छतेची काळजी घ्या.

कोणतेही इंजेक्शन, औषध, टॅटू काढण्यापूर्वी उपकरणांची स्वच्छता तपासा.

जर तुम्ही हिपॅटायटीस पॉझिटिव्ह असाल, तर नवजात बाळाला वेळेवर लसीकरण करा.

स्तनपानाबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भू-विनाश, वंशपरंपरागत घरांवर बुलडोझर, पण बेछूटपणे फैलावणाऱ्या झोपडपट्ट्यांची होतेय पाठराखण

RJ Mahavash युझीची गर्लफ्रेंड? घटस्फोटानंतर नवीन नात्याबद्दल स्पष्टच सांगितलं,''पुन्हा प्रेमात पडण्याची भीती...''

Goa Live Updates: सरकारने बेकायदेशीर कामे करू नये; किर्लपाल ग्रामसभेत इशारा

Goa Politics: खरी कुजबुज; रवींचा आशयघन विनोद

Valpoi: विद्यार्थ्यांनी घेतला 'कृषी'चा प्रत्यक्ष अनुभव, युनिटी हायस्कूलचा बिबे-धावे-सत्तरीत शैक्षणिक अभ्यास दौरा

SCROLL FOR NEXT