Pregnancy: आईसाठीच नव्हे, बाळासाठीही कॅल्शियम गरजेचं, गरोदरपणात 'या' लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका!

Calcium Deficiency In Pregnancy: गर्भधारणेदरम्यान महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता सामान्य आहे. त्याची लक्षणेही दिसून येतात. तथापि, बहुतेक महिला ही लक्षणे गर्भधारणेशी संबंधित असल्याचे समजून त्याकडे दुर्लक्ष करतात.
Calcium Deficiency In Pregnancy
PregnancyDainik Gomantak
Published on
Updated on

गर्भधारणेदरम्यान महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता सामान्य आहे. त्याची लक्षणेही दिसून येतात. तथापि, बहुतेक महिला ही लक्षणे गर्भधारणेशी संबंधित असल्याचे समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. तर गर्भधारणेदरम्यान कॅल्शियमची कमतरता आई आणि बाळ दोघांनाही गंभीर नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळे गरोदरपणात कोणत्याही प्रकारच्या लक्षणांना हलक्यात घेऊ नये. कॅल्शियमच्या कमतरतेशी संबंधित लक्षणे हलक्यात घेतल्याने गर्भवती महिलेच्या आरोग्यावरच वाईट परिणाम होत नाही तर गर्भाच्या विकासावरही त्याचा परिणाम होतो.

दरम्यान, गरोदरपणा (Pregnancy) हा कोणत्याही महिलेसाठी खूप संवेदनशील काळ असतो. गर्भधारणेदरम्यान स्वतःची आणि गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाची काळजी घेणे गरजेचे असते. म्हणूनच, गर्भधारणेदरम्यान आहार आणि दैनंदिन दिनचर्येची काळजी घेणे खूप महत्वाचे ठरते. असेही म्हटले जाते की, गर्भधारणेदरम्यान केलेल्या कृतींचा बाळावर परिणाम होतो. म्हणून, गर्भधारणेदरम्यान कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये. ही लक्षणे ओळखून तात्काळ उपचार घ्यावेत.

Calcium Deficiency In Pregnancy
Pregnancy: गरोदरपणात हृदयविकाराचा झटका आला तर? बाळाच्या जीवाला धोका पोहोचतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

कॅल्शियमच्या कमतरतेची कारणे आणि लक्षणे

गर्भधारणेदरम्यान गर्भाच्या विकासासाठी महिलेला जास्त कॅल्शियमची आवश्यकता असते. जेव्हा ती गरज पूर्ण होत नाही तेव्हा कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे दिसू लागतात. न जन्मलेल्या बाळाच्या हाडे आणि दातांच्या विकासासाठी कॅल्शियम आवश्यक असते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे इतर अनेक दुष्परिणाम देखील होऊ शकतात. गर्भधारणेदरम्यान कॅल्शियमच्या कमतरतेच्या लक्षणांमध्ये सांधेदुखी, पाय, घोटे, हात दुखणे, थकवा आणि हाडांमध्ये वेदना यांचा समावेश होतो. याशिवाय, हाडे कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढतो. या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये.

Calcium Deficiency In Pregnancy
Thyroid Dysfunction In Pregnancy: गर्भधारणेदरम्यान महिलांमध्ये का वाढते थायरॉईडची पातळी? जाणून घ्या नियंत्रित कशी करावी

स्वतःचे असे रक्षण करा

कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे दिसल्यास गरदोर महिलांना ताबडतोब आहार बदलावा. आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करावा. यामध्ये दूध (Milk), दही, हिरव्या भाज्या, बीन्स आणि काजू यासारख्या गोष्टींचा समावेश करावा. याशिवाय पालक, सोयाबीन, खजूर आणि बदाम हे देखील कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत. यासोबतच, तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरशी संपर्क साधून कॅल्शियम सप्लिमेंट्स देखील घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com