Hypoglycemia Symptoms: आपल्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) अचानक सामान्य प्रमाणापेक्षा खाली गेल्यावर उद्भवणाऱ्या स्थितीला 'हाइपोग्लायसेमिया' (Hypoglycaemia) म्हणतात. ही एक अशी स्थिती आहे की, ज्यात व्यक्ती उभी असतानाही चक्कर येऊन खाली पडू शकते. विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांमध्ये जे नियमितपणे औषधे किंवा इन्सुलिन घेत आहेत, त्यांच्यामध्ये ही स्थिती वारंवार दिसून येते. मात्र, औषधोपचार सुरु असतानाही असा धोका का उद्भवतो, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.
दरम्यान, या विषयावर नुकतीच जागतिक स्तरावर चर्चा झाली, जेव्हा स्वीडनच्या नवीन आरोग्य मंत्री एका पत्रकार परिषदेत बोलत असताना अचानक बेशुद्ध होऊन खाली पडल्या. नंतर त्यांनी स्वतःच खुलासा केला की, रक्तातील साखरेची पातळी अचानक कमी झाल्यामुळे हे घडले. हा एक गंभीर इशारा होता की, ही स्थिती कोणासाठीही धोकादायक ठरु शकते. डॉक्टरांच्या मते, साधारणपणे 70mg/dl पेक्षा कमी साखरेच्या (Sugar) पातळीला हायपोग्लायसेमिया मानले जाते.
राजीव गांधी रुग्णालयातील असोसिएट प्रोफेसर डॉ. अजित जैन सांगतात की, रक्तातील साखर पातळी अचानक कमी होणे खूप धोकादायक असू शकते. अनेकदा लोक याला केवळ थकवा किंवा अशक्तपणा समजून दुर्लक्ष करतात आणि साखरेची तपासणी करत नाहीत. अशा परिस्थितीत हायपोग्लायसेमियाची स्थिती अधिक गंभीर होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये यामुळे बेशुद्धी किंवा झटके (Seizures) येऊ शकतात. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे, जर ही स्थिती व्यक्ती झोपेत असताना उद्भवली तर ती व्यक्ती कोमामध्येही जाऊ शकते. त्यामुळे जेव्हा ही लक्षणे दिसू लागतात, तेव्हा लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
रक्तातील साखर कमी झाल्याची काही ठळक लक्षणे आहेत, जी वेळेत ओळखल्यास गंभीर परिस्थिती टाळता येऊ शकते.
अचानक घाम येणे आणि थंडी वाजणे: शरीराला गरम ठेवण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळत नसल्याने हे होते.
हृदयाचे ठोके वाढणे: शरीराला साखरेची गरज असते, ज्यामुळे हृदय अधिक वेगाने काम करते.
अचानक भूक लागणे: शरीर इंधनाची (साखर) मागणी करते.
चक्कर येणे आणि डोकेदुखी: मेंदूला पुरेशी साखर मिळत नसल्यामुळे हे होते.
चिड़चिडेपणा किंवा बेचैनी: साखरेच्या कमतरतेमुळे मानसिक आणि भावनिक बदल होतात.
धुसर दिसणे: डोळ्यांच्या नसांवर परिणाम झाल्याने दृष्टीवर परिणाम होतो.
डॉ. जैन यांच्या मते, मधुमेहाचा धोका अधिक असलेल्या लोकांसाठी हायपोग्लायसेमियाचा धोका अधिक असतो. पण, काही सोप्या टिप्स फॉलो करुन या गंभीर स्थितीपासून बचाव करता येतो.
जेवणाची कोणतीही वेळ चुकवू नका: नियमित वेळेवर संतुलित आहार (Diet) घेणे महत्त्वाचे आहे.
जास्त व्यायाम करणे टाळा: खूप जास्त किंवा अनियोजित व्यायाम केल्याने साखरेची पातळी झपाट्याने घटू शकते.
रिकाम्या पोटी दारु पिऊ नका: दारु शरीरातील साखरेची पातळी झपाट्याने कमी करते.
नियमितपणे साखरेची तपासणी करा: शुगर मॉनिटरिंग नियमितपणे करणे खूप महत्त्वाचे आहे.
व्यायामापूर्वी आणि नंतर साखरेची पातळी तपासा: यामुळे साखरेच्या पातळीत होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवता येते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.