Why Hug Is Important Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Why Hug Is Important: एक जादू की झप्पी... खरंच करु शकते मनाचे दुःख कमी? वाचा एका क्लिकवर

एक जादू की झप्पी दिल्याने केवळ एकटेपणाची भावनाच दूर होत नाही तर मनावरचे दुख: देखील कमी होते.

Puja Bonkile

Why Hug Is Important: जेव्हा आपण खूप दुःखी आणि आनंदी असतो तेव्हा आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला मिठी मारतो. ती आवडती व्यक्ती कोणीही असू शकते.जसे की तुमची आई, बाबा, भाऊ, किंवा प्रियकर असू शकतो. असे म्हणतात की मिठी मारल्याने मनातील वेदना कमी होतात आणि खूप आराम मिळतो. चला तर मग जाणून घेउया मीठी मारल्याने खरंच मानावरचे दुख: कमी होते का?

एका संशोधनानुसार मिठी मारणे केवळ एकटेपणाची भावनाच दूर करू शकत नाही तर तणावामुळे शरीरावर होणारे हानिकारक प्रभाव देखील कमी करू शकते. 

एखाद्या व्यक्तीला मिठी मारल्याने आपल्याला आनंद होतो. यामुळे आरोग्य देखील निरोगी राहते. 'हग' (Hug) केल्याने शरीर आणि मनाला शांतता मिळते. फील-गुड हार्मोन्स वाढण्यास मदत मिळते. 

  • मिठी मारण्याचे फायदे

सुरक्षा आणि विश्वासाची भावना

मिठी मारल्याने सुरक्षा आणि विश्वासाची भावना निर्माण करते.यामुळे मीठी मारणे फायदेशीर असते.  

ऑक्सिटोसिनची पातळी वाढते

मिठी मारल्याने ऑक्सिटोसिनची पातळी झपाट्याने वाढते. एकटेपणा आणि रागाची भावना कमी होण्यास मदत मिळते.

रोगप्रतिकारक शक्ती

मिठी मारल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते. तसेच शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींचे उत्पादन नियंत्रित करण्यास मदत करते. व्यक्ती निरोगी आणि रोगांपासून मुक्त राहते.

आत्मविश्वासही वाढतो

मिठी मारल्याने आत्मविश्वासही वाढतो. तेसच शरीराचा ताण दूर होऊन स्नायू शिथिल होतात.

उच्च रक्तदाब

मिठी मारल्याने उच्च रक्तदाबाची समस्याही दूर होते. एखाद्याला मिठी मारल्याने शरीरातून ऑक्सिटोसिन बाहेर पडतो. ज्याला विज्ञानाच्या भाषेत 'कडल हार्मोन' म्हणतात. कडल हार्मोन तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करते.

हृदयाचे आरोग्य

मिठी मारल्याने हृदयाचे आरोग्य वाढण्यासही मदत होते. तुम्हाला आनंदी आणि सुरक्षित वाटते. तसेच मिठी मारणे हे ध्यानासारखे आहे, जे तुमच्या मनाला शांती आणि आराम देते. 

मिठी मारल्याने मानसिक स्थिती सुधारते

एखाद्या व्यक्तीला मिठी मारल्याने मन शांत होते. यामुळे मानसिक आरोग्य देखील चांगले राहते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

Mayna Construction Project: बांधकाम प्रकल्पाविरोधात मोर्चा, मायणावासीय आक्रमक; कुडतरी पंचायतीवर धडक

iPhone 17 Pro वर भन्नाट डील! 1.34 लाखांचा फोन फक्त 56,990 रुपयांत, जाणून घ्या ऑफर

"पीओके तात्काळ खाली करा!" UN च्या मंचावरुन भारताचा पाकिस्तानला सज्जड दम; मानवाधिकार परिषदेत दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांचे धुडकावले दावे

SCROLL FOR NEXT